गोरगावले विविध कार्यकारी सोसायटीची यंदाही शंभर टक्के कर्ज फेड.. चोपडा जिल्हा बॅंक शाखेतर्फे चेअरमन -व्हायचेअरमन सचिव यांचा सत्कार
चोपडा,दि.२६(प्रतिनिधी)तालुक्यातील गोरगावले येथील विविध कार्यकारी सोसायटीने यंदाही शंभर टक्के कर्ज फेड वसुलीत यशस्वी परंपरा राखत सोसायटीच्या कार्यात मानाचा तुरा रोवला आहे.
गतवर्षाप्रमाणे यावर्षी गोरगावले येथील विकास सोसायटीने बिकट अशा परिस्थिती असतांना बँक कर्ज फेड करण्यात कोणताही चालढकल पणा न करता शंभर टक्के यशस्वी खर्च फेड केली आहे. विशेष म्हणजे यावर्षी शासनामार्फत कर्जमाफी होणार असल्याचे चिन्ह असल्यावर देखील आपण घेतलेले कर्ज फेडावे लागेल या उद्देशाने कर्ज फेडण्याच्या पायंडा यावर्षी कायम ठेवला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेमार्फत चेअरमन प्रवीण पाटील व सचिव चंपालाल पाटील,व्हाय चेअरमन यांचा शाल श्रीफळ व गुलदस्ता देऊन बँकेत सत्कार करण्यात आलेला आहे. संचालक घनश्याम अग्रवाल व रोहित निकम यांनी अभिनंदन केले आहे यावेळी अधिकारी कर्मचारी वर्ग व सोसायटीचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
