चोपडा आगारातुन २७ मार्च पासुन नांदुरीगड यात्रोत्सवासाठी जादा बसेस
चोपडा,दि.२६ ( प्रतिनिधी) नांदुरीगड येथे सप्तश्रृंगी मातेच्या यात्रोत्सवासाठी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परीवहन महामंडळाच्या चोपडा आगारातर्फे दिनांक २७ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान जादा बसेस सोडण्यात येणार आहेत तसेच ज्या ठिकाणाहुन पुरेसे प्रवाशी असतील त्या ठिकाणाहुन जादा बसेस उपलब्ध करुन देण्यात येतील.चोपडा ते नांदुरीगड प्रौढ,फुल भाडे ३७३ हाफ भाडे १८७ एवढे असुन चोपडा आगारातर्फे सोडण्यात येणाऱ्या *जादा* बसेसचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केले आहे.
