गलंगी येथे अखंड हरिनाम कीर्तन सोहळा

 गलंगी येथे अखंड हरिनाम कीर्तन सोहळा


गलंगी ता.चोपडा दि.२८(प्रतिनिधी) : संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या कृपा प्रसादाने ह.प.भ. कुमावत महाराज यांच्या आशीर्वादाने दि. 26/3/2026 ते 2/4/2026  किर्तन सप्ताह संपन्न होत आहे.  दैनंदिन रूपरेषा अशी,काकडा आरती सकाळी 

5=30ते630  प्रवचन दुपारी 4ते5 हरिपाठ सायंकाळी 5ते6 किर्तन रात्री 8:30 ते 10:30 ह.भ.प. भूषण महाराज  वाडेकर ,ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज मालेगाव, विशाल महाराज डांगरी ,रवींद्र महाराज गोराणे ,योगेश महाराज सटाणा, मोहन महाराज अजंड ,प्रविण महाराज हाताने यांचे कीर्तनाचा कार्यक्रम होत आहेत तर ह. भ. प. योगेश महाराज वरझडी यांचे सकाळी नऊ ते 11 काल्याचे किर्तन होईल यांच्यासोबत मृदुंगाचार्य, विणेकरी ,हार्मोनियम गायनाचार्य 

तसेच  अनेर परिसरातील ग्रामस्थ भजनी मंडळ, जय भोले ग्रुप, महर्षी वाल्मिक क्रिकेट टीम, रामराज्य मित्र मंडळ, वैष्णवी मेळावा मित्र मंडळ ,ऋषिराज मित्र मंडळ गलंगी यांचेही  सहकार्य लाभत आहे.

 दि. 2/4/२०२६ गुरुवार रोजी नगर प्रदक्षिणा व दिंडी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील ग्रामस्थांनी महाप्रसादाच्या लाभ घ्यावा अशी विनंती गलंगी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने