सीआयएसएफ जवान सुनील पाटील यांचे अडावदला जल्लोषात स्वागत

  सीआयएसएफ जवान सुनील पाटील यांचे अडावदला  जल्लोषात स्वागत

 अडावद दि.१३(प्रतिनिधी)येथील सीआयएसएफ जवान प्रशांत सुनील पाटील यांनी आपल्या 11 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावी आला त्यांचे मोठया जलोष्यात स्वागत करण्यात आले.

 प्रशांत हा लहान पणा पासूनच एक ध्येय वेडा होता भारत मातेची सेवा हाच त्याचा ध्यास आणि लक्ष होते त्यासाठी त्यांनी अनेक कसोट्या पार करत आपल्या गरीब परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलेले कष्टाची पुरेपूर जाणीव असलेला हा ध्येय वेडा जवान आपल्या 11 महिण्याचे प्रक्षिक्षण करून प्रथमच गावी आला त्याचे स्वागत मोठया उत्साहात ढोल ताशांच्या आवाजात आणि रस्त्यावर सुशोभित अशा रांगोळ्या व फुले टाकून स्वागत  करण्यात आले.  

गावातील जेष्ठ पत्रकार पी.आर.माळी सर, जितेंद्र कुमार शिंपी, विलास पाटील, महेश गायकवाड,रफिक मन्यार, गोपाल सुतार तसेच गावातील वरिष्ठ मंडळी अशोक पाटील, नंदलाल पाटील दिगेश सुतार, कैलास गुरव समाधान कोळी, महेश बिरारी, गणेश पाटील, धीरज पाटील, लेतेश पाटील ,स्वप्नील बाहेती यांनी जवानाचे स्वागत शाल श्री फळ देऊन केले.जवान प्रशांत पाटील हे भारतीय पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास पाटील यांचे पुतणे आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने