जि. प. उच्च प्राथमिक शाळा बोरअजंटी येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा
चोपडा,दि.१३ (प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरअजंटी येथे नुकतेच विद्यार्थ्यांना कृतीद्वारे व आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांनी स्वादिष्ट रुचकर असे खाद्यपदार्थांचे तसेच भाजीपाला व शैक्षणिक साहित्य स्टेशनरी यांचे देखील स्टॉल लावले होते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावहारिक ज्ञान व्हावे घेतलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करता यावा तसेच दैनंदिन जीवनातील गणितिय व पैशांचे व्यवहार व दैनंदिन व्यवसायाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अशा प्रकारचे उपक्रम शाळेत नेहमीच घेतले जातात शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पाटील व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सन्माननीय सदस्यांनी यशस्वी आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नागलवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री देवेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावातील सरपंच माननीय सौ शकुंतला बारेला शा.व्य.स. उपाध्यक्षा सौ.छाया कोळी आश्रम शाळेचे प्राचार्य श्री बी.के भालेराव,श्री प्रविण अण्णा सुलताने, श्री दीपक दादा भालेराव,सुनील भाऊ कोळी व ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वरअण्णा कोळी हे उपस्थित होते शाळेतील माजी विद्यार्थी माता पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या वस्तू खरेदी करून विद्यार्थ्यांना उपकृत केले उपस्थितांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबाबत शाळेतील शिक्षकांचे व शाळा व्यवस्थापन समितीचे कौतुक करून समाधान व्यक्त केले कार्यक्रमासाठी शाळेतील विलास पाटील,सुनील भोई, संतोष बाविस्कर, आधार पानपाटील, मुकेश पाटील,सौ. उज्वला पाटील प्रदीप बागुल,श्रीमती रवीना भादले,नितीन मैलागीर,राजू बारेला,जितेंद्र कोळी यांचे अनमोल सहकार्य लाभले
