समाजकार्य महाविद्यालय चोपडा व जळगाव येथील गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानेचोपडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
चोपडा,दि.१३(प्रतिनिधी)येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा व जळगाव येथील गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चोपडा मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन येथील मिलिंद वस्तीगृह पंचशील नगर चोपडा येथे करण्यात आले .
या शिबिराचे उद्घाटन चोपडा येथे गोदावरी फाउंडेशन तर्फे आलेले डॉ. जिझान सर , जनसंपर्क अधिकारी विजय राजपूत तसेच त्यांची सर्व टीम यांनी केले .
या आरोग्य तपासणी शिबिरात डॉक्टरांच्या तज्ञ पथकाने नागरिकांची वेगवेगळ्या आजारावर तपासणी केली, यामध्ये डॉ.जिझान , डॉ.राज सुरत लोखंडे, डॉ. सुशांत जाधव , डॉ .चिंतन चौधरी, अनिता डॉ. अंशिका प्रसाद, डॉ.शिवानी रसाळ, डॉ. गौरी धाडे, समन्वयक. विजय राजपूत, डॉ. लक्ष्मण पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या नर्सिंग स्टाफ यांनी टुडी इको, ECG, नेत्र तपासणी, हर्निया, शुगर, बीपी इ. रुग्णांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले .
तसेच समाजकार्य महाविद्यालय चोपडा चे प्राचार्य. डॉ. ईश्वर सौंदाणकर सर, उप प्रा.आशिष गुजराती सर व मार्गदर्शन करणारे प्रा.विनोद रायपुरे सर व शिक्षक वृंद ,स्टाफ ,व एम एस डब्ल्यू द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी पाटील व रीना जाधव यांनी केले तसेच एम एस डब्ल्यू द्वितीय वर्षाच्या क्षेत्र कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिबिराचे आयोजन करून सक्रिय सहभाग घेतला या शिबिराला एकूण 100 च्या वर रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच काही रुग्णांना जळगाव येथे पाठविण्यात येईल .
सदर शिबिरात मिलिंद वस्तीगृहाचे दीपक महाजन व त्यांचे कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे होते म्हणूनच हे शिबिर यशस्वी पूर्ण पार पडले.

