आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी मंजुर झालेल्या
चोपडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे ६व,७फेब्रुवारी भूमिपूजन
चोपडा दि.५(प्रतिनिधी)आ.श्री.चंद्रकांत बीराम सोनवणे यांचे प्रयत्नांनी चोपडा विधानसभा मतदारसंघात मंजुर झालेल्या विविध विकास कामांचा भुमीपूजन सोहळा दि. ६ फेब्रुवारी व ७ फेब्रुवारी २०२६रोजी दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे या कामांचे भूमिपूजन आ.प्रा.श्री. चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते होत असून यावेळी प्रमुख पाहुणे होऊन माजीआ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे ह्या उपस्थित राहणार आहेत.
६ रोजी भूमीपूजन होणारे विकास कामे व मंजूर रक्कम पुढीलप्रमाणे जामण्या ता. यावल येथे पाझर तलाव दुरुस्त करणे.१.०० कोटी रुपये (एक कोटी रुपये),कासारखेडा ता. यावल येथे स्मशानभूमी सांत्वन शेड बांधणे.०५.०० लक्षरु. (पाच लाख रु.), आडगाव ता. यावल येथे स्मशानभूमी सांत्वन शेड बांधणे.१०.०० लक्ष रु. (दहा लाख रु.) चिंचोली ता. यावल येथे स्मशानभूमी बांधकाम करणे.१०.०० लक्ष रु.(दहा लाख रु.), उंटावद ता.यावल येथे स्मशानभूमी सांत्वन शेड बांधणे १०.०० लक्ष रु(दहा लाख रु.) कोळन्हावी प्र.अ.ता. यावल येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे.१०.०० लक्ष रु.(दहा लाख रु.), डांभूर्णी ता. यावल येथे स्मशानभूमी पोहच रस्ता करणे.१०.०० लक्ष रु.(दहा लाख रु.),चिंचोली ता. यावल येथे बौध्दविहार लोकार्पण करणे २०.००लक्ष रु. (बीस लाख रुपये)
दुसऱ्या दिवशीचे भूमीपूजन कार्यक्रम
दि. ७ फेब्रुवारी २०२६, शनिवार रोजी होणारे भूमीपूजन कामे व मंजूर रक्कम पुढीलप्रमाणे सुटकार येथे दलित वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे.०५.०० लक्ष रु.(पाच लाख रु.),वटार येथे स्मशानभूमी बांधकाम करणे.१०.०० लक्ष रु.
(दहा लाख रु.), उनपदेव येथे १ वर्ग खोली बांधकाम करणे.१०.०० लक्ष रु.(दहा लाख रु.), अडावद येथे कन्या शाळा वर्ग खोली बांधकाम करणे.१२.५० लक्ष रु.(साडेबारा लाख रु.) कमळगाव येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे.२०.०० लक्ष रु.(वीस लाख रु.) देवगाव येथे स्मशानभूमी बांधकाम करणे.१०.०० लक्ष रु.(दहा लाख रु.)अडावद येथे माळी सामाजिक सभागृह लोकार्पण करणे. ४०.००लक्ष रु. (चाळीस लाख रुपये) ,अडावद येथे राणे राजपूत सामाजिक सभागृह लोकार्पण करणे. ३०.०० लक्ष रु. (तीस लाख रुपये, अडावद येथे भोई समाज मंदिर सामाजिक सभागृह लोकार्पण करणे. ३०.०० लक्ष रु. (तीस लाख रुपये)
