हिसाळे येथे अजितदादा पवार यांना श्रध्दांजली
घोडगाव ता चोपडादि.५ (वार्ताहर) येथुन जवळच असलेल्या हिसाळे येथे माजी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने उभ्या महाराष्ट्रावर आघात झाला आहे.यावेळी त्यांच्या आठवणी जागृत करून त्यांना सर्व पक्षीय व जातीच्या लोकांना कडुन भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी जि. प. सदस्या बेबीबाई पावरा, हिरालाल परदेशी म.राज्य किसानसभा अध्यक्ष,माजी पं. स. उपसभापती संजय संतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरपुर तालुका अध्यक्ष (अजित पवार गट)बाळकृष्ण कौतिक पाटील, रामेश्वर पाटील मा.सरपंच ,अर्जुन कोळी भा.क.प.ज्येष्ठ नेते,अभय भदाणे उबाठा ,कांतीलाल पाटील संचालक शि.सा.का. दहिवद, जितेंद्र करंकाळ वि.का.सो. व्हाइस चेअरमन , वसंत कोळी तंटामुक्ती अध्यक्ष हिसाळे ,भूषण भदाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिरपूर तालुका, दत्तात्रेय पाटील ग्रा.पं.सदस्य , व विविध संस्थाचे पदाधिकारी व राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. सुत्रसंचालन निंबा शिंपी यांनी केले.
