चोपड्यात ४ दिवसीय भव्य 'रोटरी उत्सव..कृषी मंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते शुभारंभ ♦️व्यापार,व्यजन अन् कृषी प्रदर्शन,

 चोपड्यात ४ दिवसीय भव्य 'रोटरी उत्सव..कृषी मंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते शुभारंभ

♦️व्यापार,व्यजन अन्  कृषी प्रदर्शन, मनोरंजन मेळ..प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे चैतन्य नवदुर्गाचा जिवंत देखावा

चोपडा दि.५(प्रतिनिधी)रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे दि.६ ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान  दररोज दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यत दररोज विविध कार्यक्रम भव्य 'रोटरी उत्सवात' आयोजित करण्यात आलेआहेत. व्यापार,व्यजन ,कृषी प्रदर्शन, मनोरंजन यांचा मेळ साधण्यात आला आहे.विशेष म्हणजे दररोज शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे चैतन्य नवदुर्गाचा जिवंत देखावा (झांकी)सादर करण्यात येणार आहे.

शुक्रवार दि.०६/०२/२०२६रोजी संध्या. ७:०० वाजता खान्देश प्रेसच्या मागे, बी. एड. कॉलेज समोर, चोपडा येथे कार्यक्रमाचा शुभारंभ कृषी मंत्री ना. श्री. दत्तात्रयजी भरणे यांच्या शुभहस्ते हस्ते होत असून प्रमुख पाहुणे माजी विधानसभा सभापती प्रा. श्री. अरुणभाई गुजराथी , रोटे. श्री. ज्ञानेश्वरजी शेवाळे (प्रांतपाल, रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३०) हे उपस्थित राहणार आहेत.तसेच रोटे. श्री. राजेंद्रजी भामरे (माजी प्रांतपाल, रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३०), श्री. रोहनजी घुगे (जिल्हाधिकारी, जळगांव)

 डॉ. महेश्वरजी रेड्डी (पोलिस अधिक्षक, जळगांव), श्री. चंद्रहासभाई गुजराथी (चेअरमन, चोपडा पिपल्स को. ऑप. बँक लि.)श्री. भाऊसाहेबजी थोरात (तहसिलदार, चोपडा) श्री. एम. बी. नालकर (चेअरमन, जय किसान अॅग्रो टेक इंडिया प्रा.लि., छ. संभाजी नगर) श्री. रमेशजी जैसवाल (निवृत्त ओ.एस. जिल्हा परिषद, जळगांव)यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

शनिवार,दि.०७/०२/२०२६ रोजी  संध्या. ४:३० वाजता कृषी संवाद व चर्चासन्न आयोजित असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अॅड.श्री. संदीपभैय्या पाटील (अध्यक्ष म. गांधी शिक्षण मंडळ, चोपडा),रोटे. शब्बीरजी शाकीर (माजी प्रांतपाल, रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३०), उपस्थित राहणार असून वक्ते म्हणून डॉ. श्रीमती प्राजक्ता वाघ, (कृषी तज्ज्ञ) डॉ. श्री. प्रकाश सावंत (कृषी तज्ज्ञ) चर्चा व मार्गदर्शन करणार आहेत.

रविवार दि. ०८/०२/२०२६ रोजी संध्या. ७:०० वाजतारोटरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून पालकमंत्री  ना श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे यावेळी  प्रा. श्री. चंद्रकांतजी सोनवणे (आमदार, चोपडा)रोटे. श्री. आनंदजी झुनझुनवाला (माजी प्रांतपाल, रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३०),रोटे. श्री. महेशजी मोकलकर (माजी प्रांतपाल, रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३०), सौ. नम्रताताई सचिन पाटील (लोकनियुक्त नगराध्यक्षा, न.प. चोपडा),रोटे. श्री. पंकजभैय्या बोरोले (उपनगराध्यक्ष तथा सहप्रांतपाल रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३०)हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचा समारोप सोहळा  सोमवार दि. ०९/०२/२०२६ रोजी संध्या. ७:०० वाजता होणार आहे याप्रसंगी रोटे. श्री. राजेशजी पाटील (प्रांतपाल २६-२७, रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३०), रोटे. श्री. राजीवजी शर्मा (माजी प्रांतपाल, रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३०), श्री. भूपेंद्रभाई गुजराथी (नगरसेवक, न.प. चोपडा),श्री. मधुकरजी साळवे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चोपडा),श्री. रामनिवासजी झंवर (मुख्याधिकारी, नगरपरिषद चोपडा) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी कार्यक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन आयोजक आशिष जैसवाल(अध्यक्ष ),रोटे. विश्वास दलाल(सचिव),रोटे. संजय बारी(प्रकल्प प्रमुख),रोटे. लीना पाटील,रोटे. चंद्रशेखर साखरे,रोटे. संदीप सूर्यवंशी ,रोटे. डॉ. निता जैसवाल,रोटे. विपुल छाजेड,रोटे. रोटे. विलास पी. पाटील,रोटे. संदीप पाटील व सर्व सदस्य, रोटरी क्लब ऑफ चोपडा यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने