नगरसेविका सौ.उज्वलाताई किशोर बाविस्कर यांनी प्रभागात केला पाइपलाइन कामाचा "श्री गणेशा" 🔴 महानगरपालिका खुर्चीवर विराज

 नगरसेविका सौ.उज्वलाताई किशोर बाविस्कर यांनी प्रभागात केला पाइपलाइन कामाचा "श्री गणेशा" 

🔴 महानगरपालिका खुर्चीवर विराजमान होताच नव्या पर्वाचा केला आरंभ


जळगावदि.२३(प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिका क्षेत्रात कामांचा धुमधडाका गाजविणाऱ्या टॉप टेन नगरसेवकांमध्ये नगरसेविका सौ. उज्वलाताई किशोर बाविस्कर यांची जोरदार  आघाडी असून त्यांचे पती माजी नगरसेवक किशोर आप्पा बाविस्कर यांच्या नावाचाही गत काळातही गव गवा गाजला आहे. एकंदरीत जनसेवेने झपाटलेले या दाम्पत्याने अजूनही नव्याने उमेदीने कामांचा  श्रीगणेशा केला आहे.

काल  दि, 23/०२/२६, रोजी प्रभाग क्रमांक दोन मधील चौघुले प्लॉट,व,ओक नगर परिसरात, जुन्या पिण्याच्या पाईपलाईनला कमी दाबाने पाणी पुरवठा नागरिकांना होत  असल्याचे लक्षात घेऊन  नवीन पिण्याच्या पाईपलाईन टाकण्यास आरंभ केलाआहे.नव्याने खुर्चीवर विराजमान होताच जोमाने काम सुरू केल्यामुळे प्रभागवासिय त्यांच्या कार्यावर जाम खूष झाले आहेत.

माजी नगरसेवक किशोर रमेश बाविस्कर यांनी सतत पाठपुरावा करून मंजुरीपर्यंत आणून ठेवलेल्या पाईपलाईन कामांचे उद्घाटन काल रोजी विद्यमान नगरसेविका सौ.उज्वला किशोर बाविस्कर यांच्या शुभहस्ते नारळ फोडून भूमिपूजन करून करण्यात आले. 

यावेळी नगरसेवक सागर शामकांत सोनवणे, नगरसेवक,श्री.पियुष कोल्हे,व, माजी नगरसेवक, मुकुंदा सोनवणे, विनोद कोळी, मनपा कर्मचाऱ्यांरी , अनिल  कोळी, साईनाथ कोळी, श्री.पाटील , अनिता कोळी,सरिखा गाढवे, आशा ताईं, राजपूत ताई,चौधरी ताई, खूप संख्येने महिला उपस्थित होते  प्रभागातील महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिक गण उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने