चोपडा नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा रु.३०२.३७ कोटींचा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर !
🔴 कोणतीही कर दर न वाढवता नसलेला अर्थसंकल्प
चोपडा दि.२४(प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या वित्तीय वर्षासाठी तब्बल ₹३०२.३७ कोटींचा लोकाभिमुख व विकासाभिमुख अर्थसंकल्प कोणतीही करवाढ न करता दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. हा अर्थसंकल्प विकासाचे शिल्पकार आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांच्या नेतृवाखाली अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
☆ उत्पन्नाचे प्रमुख स्रोत (अंदाजित)
मालमत्ता कर १७.११ कोटी, पाणीपट्टी कर ₹४.६५ कोटी, न.पा. मालमत्ता पासून भाडे व फी ११०.६९ कोटी तसेच शासनाकडून वेगवेगळ्या निधीद्वारे म्हणजे अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना र.₹ १० कोटी, नगरोत्थान जिल्हास्तर योजना र. ११० कोटी, विशेष वैशिष्टयपूर्ण योजना र. १ २२ कोटी, महा. सुवर्ण जयंती नगरोत्थान भुयारी गटार योजना १. ₹ ३० कोटी, विशिष्ट नागरी सेवा सुविधा र. १२० कोटी, रस्ते विकास प्रकल्प (राज्यस्तर) र. र ५० कोटी, महा. सुवर्ण जयंती नगरोत्थान पा.पु. योजना टप्पा 2- र. १५ कोटी, नदी संवर्धन योजना र. १२० कोटी, अमृत योजना र. १५ कोटी, 15 वा वित्त आयोग र. ७कोटी, स्वच्छ भारत मिशन र. ₹ १२ कोटी, आरक्षित जागा संपादन करणे कामी अनुदान र. ₹१० कोटी, सौर ऊर्जा प्रकल्प अनुदान र. १५ कोटी..
☆ विकासकामांसाठी भरीव तरतुदी :-
अ) पायाभूत सुविधा व नागरी विकासः रस्ते विकास प्रकल्प (राज्यस्तर) ₹४२ कोटी, महा. सुवर्ण जयंती नगरोत्थान भुयारी गटार योजना ₹३० कोटी, विशिष्ट नागरी सेवा सुविधा ११८ कोटी, नदी संवर्धन योजना ११९.५ कोटी, अमृत योजना ₹४.५ कोटी, १५ वा वित्त आयोग ₹७ कोटी, स्वच्छ भारत मिशन ११२ कोटी, सौर ऊर्जा प्रकल्प १५ कोटी....
ब) सामाजिक व कल्याणकारी योजना: अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना ११० कोटी. नगरोत्थान जिल्हास्तर योजना ₹१० कोटी, विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना १२२ कोटी, आरक्षित जागा संपादन अनुदान ११० कोटी, नाना-नानी पार्क विकस्नि करणे ११ कोटी, अग्निशमन बळकटीकरण ११ कोटी, नवीन पथदिवे / णेल उभारणी ११ कोटी, माझी वसुंधरा अभियान १२ कोटी....
अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा दस्तऐवज नसून शहर विकासाचा रोडमॅप आहे: नगराध्यक्षा सौ.नम्रता पाटील
या तरतुदींमुळे चोपडा शहरात स्वच्छता, पर्यावरण, सुरक्षितता आणि दर्जेदार नागरी सुविधा यामध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित आहे. या अर्थसंकल्पाबाबत नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी सांगितले की, हा अर्थसंकल्प आमदार प्रा. श्री. अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बनविण्यात आला असून हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वागीण विकासाचा रोडमॅप ठरावा, अशी दूरदृष्टी ठेवून नगरपरिषदेने करदरात कोणतीही वाढ न करता नियोजनबद्ध महसूल संकलनावर भर देऊन तयार केला आहे. हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा दस्तऐवज नसून, तो चोपडा शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आखलेला विकासाचा संकल्प आहे. कोणतीही करवाढ न करता एवढ्या मोठ्या रकमेचा अर्थसंकल्प सादर करणे हे नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेचे आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. यात मूलभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, सामाजिक कल्याण आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीवर विशेष भर देण्यात आला आहे.
चोपडा नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने हा लोकहिताचा अर्थसंकल्प तयार केला आहे. मुख्याधिकारी श्री. रामनिवास झंवर तसेच लेखाधिकारी श्री. मयुर नंदलाल गर्मा यांनी अर्थसंकल्पाची सविस्तर माहिती सभेत सादर केली. लेखा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व नियोजनबद्ध पद्धतीने अंदाजपत्रक तयार केले.यावेळी किरकोळ विरोध वगळता बहुमताने मंजुरी देण्यात आली आहे प्रसंगी मोठ्या संख्येने नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
