अखेर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे दोन्ही पोलिस कॉन्स्टेबल निलंबित

 अखेर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे दोन्ही पोलिस कॉन्स्टेबल निलंबित 



चोपडा दि.१८(प्रतिनिधी) :चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे एकमेकांना हाणामारी केल्या प्रकरणातील दोन्ही हेड यांना कॉन्स्टेबल निलंबित  करण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या सिनेस्टाईल हाणामारीने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

शशिकांत पारधी आणि राकेश पाटील हे दोघे मागील पाच ते सह वर्षांपासून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. ड्युटी वाटप, हजेरी आणि अंतर्गत कामकाजाच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता.त्यानंतर हाणामारीत रुपांतर झाले  ह्या प्रकरणी वरिष्ठांनी दखल घेत दोन्ही हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले असून भारतीय न्याय संहिता कलम १९४(२)प्रमाणे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलिस निरीक्षक महेश टाक यांनी प्रसार माध्यमांना दिली. 

एका महिन्याचा आत चोपडा तालुक्यातील लक्ष्मण शिंगाणे (शहर पोलिस ),राकेश पाटील ,शशिकांत पारधी(दोन्ही ग्रामीण पोलिस)तिन्ही हेड कॉन्स्टेबल यांचे निलंबन करण्यात आल्यामुळे सपूर्ण जिल्ह्यात खडबळ उडाली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने