अडावदला धर्मविर बलिदान मासानिमित्त ह.भ.प सोहम पाटील धाराशिवकर यांचे व्याख्यान संपन्न
चोपडा दि.१८(प्रतिनिधी) : धर्मविर बलिदान मास निमित्त अडावद येथे ह. भ. प सोहम दादा पाटील धाराशिवकर यांचा दि.17 फेब्रुवारी रोजी मुरलीधर मंदिराचा पटानंगणावर भव्य व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी त्यांनी धर्मविर संभाजी महाराज यांचे पूर्ण आत्मचरित्र विविध मार्मिक उदाहरण देऊन समजावून सांगितले. यावेळी गावातील नवतरुण, प्रौढ मंडळी, माता, भगिनीं मोठया संख्येने उपस्थित होते.
