अडावद येथे "शुकराना मेरे श्याम का" भजन कार्यक्रम संपन्न
अडावद ता. चोपडा दि.५(प्रतिनिधी):येथे जया एकादशीच्या पवित्र दिवसाचे औचित्य साधून खाटू श्याम यांच्या जीवनावर आधारित 'शुकराना मेरे श्याम का' भजन संध्या कार्यक्रम व्यापारी संघटनेमार्फत आयोजित करण्यात आला. त्यास व्यापारी संघटनेने सहकार्य केले.
५ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा उपबाजार अडावद येथे खुल्या जागेवर हारे का सहारा बाबा श्याम हमारा यांच्या जीवनावर आधारित श्री श्याम बाबा का भव्य संकीर्तन व भजन सध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात भजन गायक जळगाव येथील सौ. उज्वलाजी वर्मा यांनी बार्बरिक उर्फ खाटू श्याम यांच्या जीवनपट आपल्या भजनातून व्यक्त केले. यावेळी शेकडो भाविकांनी भक्तिभावाने या भजन संध्येचा रसास्वाद घेतला. सदर कार्यक्रमाचे आयोजन अडावद येथील व्यापारी संघटनेमार्फत करण्यात आले.
