सी. बी. निकुंभ विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

 सी. बी. निकुंभ विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

चोपडा,दि.१७ (  प्रतिनिधी     ) तालुक्यातील घोडगांव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी. बी. निकुंभ माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात विविध स्पर्धा परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून फेब्रुवारी - २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या ८ वी शिक्षवृत्ती परीक्षेत 

जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत असलेले विद्यार्थी हर्षदा शत्रुघ्न कोळी,  

मानवी संभाजी न्हावी, 

मयुरी सुनिल सोनवणे, 

पूर्वी जितेंद्र पाटील, 

उन्नती विलास कोळी,

हर्षल चंद्रभान कोळी, 

वेदिका लोटन देवराज 

तसेच एस. टी. संवर्गातून जिल्ह्यात प्रथम आलेल्या 

निलेश मोतीराम बारेला  यांचे कौतुक करण्यात आले. तसेच 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ७ वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आमच्या विद्यालयातील १२ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

 जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील गुणवंत विद्यार्थी तालुक्यातून प्रथम व जिल्हा यादीत चौथा क्रमांक मिळवणारी जान्हवी रामकृष्ण कोळी, तालुक्यातून द्वितीय चेतन विनोद कोळी,तृतीय हर्षदीप योगेश पाटील,

 दुर्गेश नानू शिरसाठ,  राकेश जितेंद्र गोसावी, 

चेतन जगदिश कोळी, अल्मास तंजीम खाटीक, 

 गोविंद नरहर कोळी,

जान्हवी मुकेश पाटील,

भाविका प्रविण साळवे,

तसेच ग्रामीण भूमिहीन शेतमजूर पाल्य गटातील  कार्तिक राजेंद्र पावरा — जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक,

विवेक एकनाथ कोळी — जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत चतुर्थ क्रमांक यांचाही गौरव करण्यात आला. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थी एप्रिल - २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेत एस. एन. आर. जी. इंग्लिश मेडीयम स्कुल चे चैतन्य मुकेश शिरसाठ, जयेश सतिष पाटील, निर्वाण हेमराज कढरे, गरिमा योगेश पवार या सर्व विद्यार्थ्यांचा पालकांसह बक्षीस, ट्रॉफी व गुलाबपुष्प देऊन सत्कार व कौतुक करण्यात आले. तसेचशाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांचा अपघाती विमा काढला जातो याअंतर्गत इयत्ता ९ वीतील रितेश रमेश पाटील याला २१३४८/- रुपये इतका अपघाती विमा मंजूर झाला त्याचा चेक संस्थेचे चेअरमन व मान्यवरांच्या यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी मंचावर संस्थेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष द्रविलाल पाटील, सचिव जवरीलाल जैन, सहसचिव भानुदास पाटील, मदन पाटील, रमेश पाटील, पांडुरंग महाजन, खंडेराव सोनवणे, सुदाम सोनवणे, निंबा पाटील, रमाकांत सोनार, कांतीलाल पाटील, गोविंदभाई गुजराथी, अवधूत ढबू, मुख्याध्यापक रमेश चौधरी, पर्यवेक्षक प्रसाद बाविस्कर, एस. एन. आर. जी  आय. टी. आय. चे प्राचार्य अविनाश सूर्यवंशी यांच्यासह पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  जगदिश पाठक यांनी केले. यावेळी सी. बी. निकुंभ विद्यालयाचे, एस. एन. आर. जी इंग्लिश स्कुल,  कनिष्ठ महाविद्यालय व आय. टी. आय.चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने