अध्यापक विद्यालय चोपडा येथे 'हिंदी दिवस' मोठ्या उत्साहात साजरा
चोपडा,दि.१७(प्रतिनिधी) एज्युकेशन सोसायटी संचलित, अध्यापक विद्यालय, चोपडा जि.जळगाव येथे'हिंदी दिवस' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली द्वितीय वर्षाच्या वैष्णवी धनगर व त्यांच्या गटाने स्वागत गीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्येची आराध्यदैवत माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते झेपअंकाचे प्रकाशन करण्यात आले . त्यानंतर प्रमुख अतिथी श्री गोविंदभाई गुजराथी यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन श्री किरण पाटील सर यांनी केले. त्यानंतर कु. सीता बारेला या द्वितीय वर्ष छात्राध्यापिकेने आपले मनोगत सादर केली .
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व संस्थेचे समन्वयक श्री. गोविंदभाई गुजराथी यांनी आपल्या अतिथी भाषणातून 'भाषा समाजाला व राष्ट्राला कशी जोडून ठेवते' व 'भाषा कोणतीही असली तरी ती आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी किती महत्त्वाचे आहे' याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले.तसेच आकर्षक कार्यक्रमपत्रिका कु. रोशनी पाटील व झेपअंक कु. सविता ठाकूर या छात्राध्यापिकांनी तयार केले. शिक्षक मनोगत प्रा.रुश्मी शेख मॅडम व अध्यक्षीय भाषण श्री किरण पाटील सर यांनी हिंदी दिनाचे महत्त्व व तो का साजरा केला जातो याचे मार्मिक शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन द्वितीय वर्ष छात्राध्यापिका कु. दिव्यानी धनगरने केले .तसेच उत्कृष्ट असे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष छात्राध्यापिका कु. निकिता धनगरने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
