बाल ब्रह्मचारी तपस्वी साध्वी डॉ. कपिला गोपाल सरस्वती दीदींची चोपड्यात पाच दिवसीय "भव्य गौ कृपा कथा

 बाल ब्रह्मचारी तपस्वी साध्वी  डॉ. कपिला गोपाल सरस्वती दीदींची चोपड्यात पाच दिवसीय "भव्य गौ कृपा कथा " 


चोपडा,दि.११(प्रतानिधी) चोपडा शहर व पंचक्रोशीत पहिल्यांदाच पाच दिवसीय "भव्य गौ कृपा कथा"चे आयोजन करण्यात आलेले आहे. ही कथा दिनांक 21/ 12/ 2015 ते 25 /12/ 2025 घ्या दरम्यान दुपारी २ ते ५ या  कालावधीत होईल.  कथा कृषी उत्पन्न बाजार समिती आवार चोपडा येथे होत असून कथेच्या प्रवक्त्या  बाल ब्रह्मचारी तपस्वी साध्वी  डॉक्टर कपिला गोपाल सरस्वती दीदी उर्फ आस्था दीदी ह्या असून त्यांच्या सुश्राव्य  वाणीत कथा ऐकावयास मिळणार आहे .

कथेच्या प्रथम दिवशी म्हणजे 21  रोजी सकाळी 11:३० वाजता विद्याविहार कॉलनी मधील हनुमान मंदिरापासून ते कथासळापर्यंत भव्य कलश यात्रा निघणार आहे तसेच त्या कथेचे प्रसारण धेनू टीव्ही व youtube वर प्रसारित देखील होणार आहे .विशेष म्हणजे या कथेद्वारे गो कृपा पासून श्रावण बाळासारखी संतान प्राप्ती, गर्भस्थ बाळाला चांगले संस्कार देणे ,विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास तात्काळ कायम स्वरुपी  स्मरणात  कसा ठेवावा तसेच कुमारी कन्याला नऊ सोमवारच्या आत सुयोग्य पती कसा मिळणार? सासू-सासरे व पतीची सेवा करणारी सून कशी मिळेल? राधाकृष्ण सारखे प्रेम पती-पत्नीमध्ये  कसे स्थापित होईल आदि बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरी या कथा श्रवणाचा लाभ  मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कथा आयोजक ज्ञानेश्वर पाटील, नंदलाल पाटील, सतीश पाटील, लखन भैय्या व कामधेनु गोसेवक समूह गोपाल परिवारातर्फे  करण्यात आले आहे.





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने