शिवसेना व कॉंग्रेस आघाडी पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणा..अॕड.भैय्यासाहेब संदीप पाटील यांचे प्रभाग क्रमांक ५ च्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेत आवाहन
चोपडा,दि.२७(प्रतिनिधी) नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक ५ अ चे अधिकृत उमेदवार रुकसार बी. अब्दुल सौद बागवान व प्रभाग क्रमांक ५ ब शिवसेनेचे अधिकृत उमेदवार योगेंद्र उर्फ पियुष राजेंद्र चौधरी यांच्या व शिवसेना- कॉंग्रेस आघाडी चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ. नम्रता सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ महावीर नगर येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आली होती त्यात काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संदीप भैया पाटील व कृउबा सभापतीचे नरेंद्र पाटील यांनी शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणा असे जाहीर आवाहन केले.
कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाचे व्हिजन तयार करण्यात आले त्यामुळे एक नवीन शहर पाहण्याचे स्वप्न नागरिकांचे पूर्ण होणार असून आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात झालेल्या उत्कृष्ट कामांचीही त्यांनी आठवण करून देत जिथे जिथे कॉंग्रेस व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत तिथे 'पंजा 'व 'धनुष्य बाण' चिन्हावर बटन दाबून उमेदवारांना प्रचंड संख्येने निवडून आणा असे जाहीर आवाहन अॅड.संदीपभैय्या पाटील यांनी केले.
यावेळी चोपडा कॉलेज संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्मिता ताई पाटील, माजी सभापती सुरेश सिताराम पाटील, माजी नगरसेवक नवनाथ दारुंडे ,कृउबा समिती संचालक नंदकिशोर सांगोले, गोविंदा महाजन, अजाबराव पाटील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नम्रता सचिन पाटील, उमेदवार पियुष चौधरी, उमेदवार रूकसारबी अब्दुल सौद, प्रा प्रमोद पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुरेखा माळी, सौद मेहमूद बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमोद पाटीलसर, किशोर बडगुजर,पत्रकार महेश शिरसाठ, फुलचंद चौधरी, अनिल बागुल,प्रकाश तायडे,रतिलाल बडगुजर,पियूष चव्हाण, रवींद्र भवराळे, वसंत बडगुजर, अनिल बागुल,आकाश मराठे, योगेश प्रकाश चौधरी, महेश पाटील,किरण लोहार, गोपाल दाभाडे, दिनेश मासरे,प्रणव राजपूत,सोनाली राजपूत, सुनिता पाटील, सुलभा सोनवणे योगिता बागुल यांच्यासह परिसरातील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.
