प्रमोद बारेला यांनी आदिवासी अनाथ युवकाला तात्काळ रेशन कार्ड मिळवून दिल्याने झाला मोफत उपचार

 प्रमोद बारेला यांनी आदिवासी अनाथ युवकाला तात्काळ  रेशन कार्ड  मिळवून दिल्याने झाला मोफत उपचार

चोपडा,दि.२४(प्रतिनिधी) तालुक्यातील लासूर गावातील आदिवासी समाजातील एक 22 वर्षीय सुनील भोंगा बारेला हा अनाथ युवकाचा रस्त्यात अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याच्या पाय फॅक्चर झाल्याने त्याचं जीवनावर संकट कोसळले होते. तसेच आई-वडील ही नसल्याने कोणी सोय पाहणारा नव्हता, तर अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थितीमुळे उपचाराचे कोणतेही मार्ग उरले नव्हते. अशात पायाला गंभीर फ्रॅक्चर झाल्याने तातडीने ऑपरेशनची गरज होती. परंतु सरकारी आरोग्य योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्याच्याकडे रेशन कार्ड नसल्याने उपचाराची प्रक्रिया अडखळत होती.

ही घटना तेथील ग्रामपंचायत सदस्य राम बारेला यांनी प्रमोद भरला यांच्याकडे मदत मागितीली आणि आदिवासी समाजसेवक प्रमोद बारेला उप सरपंच यांनी पुढाकार घेत युवकाला धीर दिला आणि पुरवठा अधिकारी चोपडा यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची व्यवस्था करून केवळ एका दिवसात त्याचे रेशन कार्ड तयार करून दिले.

रेशन कार्ड मिळताच पाटील हॉस्पिटल चोपडा येथे खासगी रुग्णालयात त्याला पूर्णपणे मोफत उपचाराची व्यवस्था करण्यात आली. डॉक्टरांनी तातडीचे उपचार व ऑपरेशन करून युवकाचा जीव वाचवला. आणि घरी सुखरूप घरी पोहोचला

या सेवा मुळे गावांत आणि आदिवासी समाजात प्रमोद बारेला व राम बारेला याची कौतुकाची भावना व्यक्त होत आहे. वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे एका तरुणाचे जीवन वाचले, तसेच शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी संवेदनशीलता आणि तत्परता किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.स्थानिकांनी सांगितले की,


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने