आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पहिली वर्गात प्रवेश द्या.. प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन

 

आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पहिली वर्गात प्रवेश द्या.. प्रकल्प अधिकाऱ्यांना  निवेदन 


चोपडा,दि.10(प्रतिनिधी)आदिवासी विकास प्रकल्प यावल कार्यालयांतर्गत  इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता पहिली ऍडमिशन साठी प्रयत्न करणाऱ्या पालकाच्या हाती निराशा आली असून आमच्या पाल्यांना त्वरित प्रवेश द्यावा अन्यथा आंदोलन पुकारून न्याय मिळवू अशा आशयाचे निवेदन विकास प्रकल्प अधिकारी यांना आदिवासी पालकांनी दिले आहे .निवेदनाची प्रत अप्पर आयुक्त , आदिवासी सचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडेही दिलेले आहे. 

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रकल्प कार्यालयांतर्गत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश फार्म भरून प्रक्रिया राबवण्यात आली आहे त्यातील 325 अर्जांपैकी केवळ 19 विद्यार्थ्यांचे सोडत लावलेली आहे. तरी उर्वरित विद्यार्थी च्या पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून विद्यार्थ्यांचे भविष्य हे धोक्यात आल्याने संबंधितांनी त्वरित लक्ष घालून 325 च्या वर असलेल्या विद्यार्थ्यांचे नावे ही यादी समाविष्ट करावे अशी मागणी  केली आहे

निवेदनावर रेवसिंग लुकाणसिंग बारेला, संजय गनदास बारेला,साहेबराव सुकलाल बारेला,छगन रामसिंग बारेला,किशोर मांगिलाल बारेला,बिलसिंग भंग्या बारेला,पुनमचंद देवसिंग पावरा,विदेश बळीराम पावरा,प्रविण पोपट पावरा,सुनिल गंगाराम पावरा,समाधान गणदास बारेला,दिनकर रामलाल बारेला,नवलसिंग मोतीराम बारेला,प्रेमसिगं चंदू बारेला,शांताराम किरला बारेला,सायसिंग केशव बारेला,ध्यानसिंग बिराम बारेला, विगा बलीराम पावरा,सुरेश मालसिंग पावरा,रमेश दूरविंग पावरा,हासीराम सुळ्या पावरा,सुनिल सुकलाल बारेला,वेलचंद वागऱ्या पावरा, विनोर बिगाड्या पावरा,प्रकाश चिमा पावरा ,निवास रामू बारेला, दिनेश मांगिलाल बारेला यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने