चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावास समाप्ती
चोपडा दि.७(प्रतिनिधी)येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा तालुक्याच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तिमाही वर्षवास कार्यक्रम जिल्हाच्या व राज्याच्या नियोजनानुसार सुरू होता आज वर्षवास पुष्पमाला समाप्ती समारोप कार्यक्रम संपन्न झाला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुदाम रामदास करंनकाळ माजी तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चोपडा हे होते.सदर वर्षवास मालिकेचे उद्घाटन सुनिल जगन शिरसाठ व त्यांच्या सौ. यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच सुनिल शिरसाठ यांचे चिरंजीव डॉ. राकेश शिरसाठ हे बी.ए.एम.एस.प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने भारतीय बौध्द महासभा कडून सत्कार करून अभिनंदन केले.यावेळी सर्व उपासकांना सुनिलशिरसाठ यांच्या कडून खीरदान व फळाहार वाटप करण्यात आला.
आजच्या विषय बौद्ध धम्म व मानवता या विषयावर प्रवचनकार बापूराव गिरधर वाणे यांनी धम्म देसना दिली.यावेळी शालिकग्राम व्यकट करंदीकर,सुदाम करंनकाळ,संजय अहिरे,सचिन बाविस्कर,अनिल वाडे यांनी सुद्धा या विषयावर मार्गदर्शन केले. वर्षावास कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शहराध्यक्ष भरत भीमराव शिरसाठ यांनी केले.
सदर कार्यक्रमास बापूराव वाणे, शालिकग्राम करंदीकर,सुदाम करंकाळ,जानकीराम सपकाळे, रामचंद्र आखाळे,छोटू वारडे, संजय अहिरे, सचिन बाविस्कर, अनिल वारडे, सुदाम ईशी, वसंत शिंदे, पुंडलिक भालेराव, सुनिल शिरसाठ, संतोष बाविस्कर, जुलाल करंकाळ, कणखरे सर,बौध्द उपासक, उपासिका उपस्थित होते.शेवटी अनिल वारडे यांनी आभार मानून वर्षावास कार्यक्रम समाप्ती समारोप संपन्न झाला.