आर. एल. बाविस्कर यांची लासुर हायस्कूलच्या

 आर. एल. बाविस्कर यांची लासुर हायस्कूलच्या उपमुख्याध्यापक पदी नियुक्ती


चोपडा,दि.१५(प्रतिनिधी) :लासुर तालुका चोपडा येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या महात्मा गांधी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उप मुख्याध्यापक पदी जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे माजी मानद सचिव श्री आर. एल. बाविस्कर यांची उपमुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी याबाबतीत नुकतेच उप मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याचे आदेश पारित केला आहे. 

श्री आर एल बाविस्कर यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याने किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य अनिल हिम्मतराव पाटील, उपाध्यक्ष सुरेश फुलचंद सुराणा, सचिव विक्रम रामदास माळी,संस्थेचे संचालक मंडळ आणि लोकल ऑडिटर अनिस कुरेशी, मुख्याध्यापक श्री आर. एस. पाटील आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री आर. एल. बाविस्कर यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने