नगर वाचन मंदिराच्या वार्षिक सभेत वाचन प्रेरणा दिन संपन्न
चोपडादि.१५(प्रतिनिधी) - येथील तालुका वाचनालय नगर वाचन मंदिराची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष आशिष गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली अमरचंद सभागृहात संपन्न झाली.वाचनालयात असलेल्या मोठ्या संख्येच्या ग्रंथ संपदेच्या वाचनाकडे रसिकांनी वळण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रारंभी माजी राष्ट्रपती मिसाईलमॅन ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.तसेच गतवर्षांत मृतांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.अहवाल वाचन कार्यवाहन गोविंद गुजराथी यांनी केले.तर आर्थिक पत्रकांचे वाचन आशिष गुजराथी यांनी केले.खेळीमेळीच्या वातावरणात सात विषयांना मंजुरी देण्यात आली.
कलांमांचा संघर्ष जीवन शिकवितो - पंकज शिंदे
मिसाईलमॅन ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे जीवन बालपणापासून संघर्षरत होते.त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेला संघर्ष ध्येय प्राप्तीसाठी मार्गदर्शक असाच आहे.त्यातून सामान्य जनांचे जीवन घडू शकते असा आशावाद प्रताप विद्या मंदिराचे शिक्षक पंकज शिंदे यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त बोलतांना व्यक्त केले.यावेळी अविनाश कुळकर्णी यांनी ग्रंथ वाचन आयुष्यात कसे बदल घडवितो याकडे लक्ष वेधत वाचनाकडे वळण्याचा संदेश दिला.
यावेळी सभेचे सुत्रसंचालन गोविंद गुजराथी यांनी केले तर आभार उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुळकर्णी यांनी मानले.अवधुत ढबू यांच्या राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी संचालक श्रीकांत नेवे,ॲड.अशोक जैन,संजिव गुजराथी,प्रभाकर महाजन,विलास एस. पाटील, स्नेहल पोतदार, धीरेंद्र जैन,डॅा.राहुल मयूर, डॅा.सुभाष देसाई,रजनी सराफ,विद्या अग्रवाल आदि उपस्थित होते.यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.