विद्यार्थ्यांनी मोबाईल हाताळतांना काळजी घ्यावी : सपोनि प्रमोद वाघ ♦️अडावद येथे शा. ये. महाजन विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा


 विद्यार्थ्यांनी मोबाईल हाताळतांना काळजी घ्यावी :  सपोनि प्रमोद वाघ  

♦️अडावद येथे शा. ये. महाजन विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा 


अडावद ता. चोपडा दि.१५(प्रतिनिधी)येथील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालय येथे वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाचनाच्या महत्वासोबत आजच्या काळात विद्यार्थ्यांच्या हातात पडणारा मोबाईल त्यांनी काळजीपूर्वक हाताळावा अन्यथा होणाऱ्या कटू परिणामांना सामोरे जावे लागेल.

       १५ रोजी दुपारी १२ वाजता वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. के. पिंपरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार शेषराव तोरे हे होते. विद्यार्थ्यांना वाचनाची आयुष्यभर सवय लावण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, बौद्धिक वाढ़, आत्मशोध आणि सर्जनशीलतेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी शाळांमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस आपल्याला सतत वाचन करण्यासाठी प्रेरित करीत असतो. असे प्रतिपादन मुख्याध्यापक आर. के. पिंपरे यांनी केले.

    यावेळी सपोनि प्रमोद वाघ यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व महिला सुरक्षा याविषयी मार्गदर्शन करताना आपण पालकांकडून मोबाईल अभ्यासाच्या निमित्ताने घेतो, परंतु त्यात गेम खेळत असताना त्यांचा मोबाईल नंबर चुकीच्या व्यक्तींच्या हातात पडतो तो त्यांचे बँकेचे खातेच साफ करून टाकतो. विद्यार्थिनींनी विविध ऍप्स वापरतांना घ्यावायची काळजी व त्यातून होणारी फसवणूक याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. 

    या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपशिक्षक एन. ए. महाजन, व्हि.एम.महाजन, एस. जी. महाजन, एम. एन. माळी, पि.आर.माळी, एस. बी. चव्हाण, एस.के . महाजन, पि.एस.पवार, निकिता माळी लिपिक सी.एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, कैलास महाजन, अशोक महाजन यांनी परिश्रम घेतले.  सूत्रसंचालन व आभार एस. जी. महाजन यांनी व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने