जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मिनलजी करनवाल यांच्या प्रयत्नामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न निकाली
जळगाव दि.१५(प्रतिनिधी)दिनांक 15 ऑक्टोबर 2025 आदरणीय मिनलजी करनवाल मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या प्रयत्नाने आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यापासून पगार झालेले नव्हते त्यांच्या सर्वांचे पदे सेवार्थ प्रणाली मध्ये ॲड करण्यासाठी महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या कडे पाठपुरावा करून सेवार्थ प्रणाली मध्ये 682 पदे ऍड करण्यात आलीत व त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगाराचा प्रॉब्लेम कायमचा दूर झाला,
तसेच आरोग्य सहाय्यक व एन.एम. एल.एच.वी. सवर्गातून आरोग्य विस्तार अधिकारी पदी,ANM सवर्गातून LHV ने, MPW सवर्गातून HA सवर्गाला पदोन्नती मिळाल्याबद्दल..
मिनलजी करनवाल-मुख्य कार्यकारी अधिकारी यांना "वह्या" भेट देऊन व मुख्य भूमिकेतील डॉ.सचिनजी भायेकर-जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पुष्पगुच्छ आणि थोर महात्म्यांचे पुस्तक भेट देऊन आभार मानले.
तसेच जि.प.आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सर्वच वरिष्ठ सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक जि.प.आरोग्य विभाग जळगाव या सर्वांच्याच प्रयत्नानी सर्व शक्य झाले असुन या सर्वांचे संघटनेमार्फत पुष्पगुच्छ देऊन हार्दिक आभार तथा अभिनंदन करण्यात आले.
सदरच्या आभार प्रदर्शनासाठी श्री संजय ठाकूर, श्री.विजय देशमुख, श्री. राजेश कुमावत, श्री.सुनील शिंदे, श्री.भालचंद्र पवार, व श्री.नामदार तडवी असे सर्वच संघटना पदाधिकारी प्रसंगी उपस्थित होते.