अडावद सार्वजनिक विद्यालयात पंधरा वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

 अडावद सार्वजनिक विद्यालयात  पंधरा वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा  

फोटो कॅप्शन अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात स्नेह मेळाव्याला उपस्थित माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी व येथील संस्थेचे सचिव मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी .

अडावद ता २९ (प्रतिनिधी) :- अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात सन 2009-10 या शैक्षणिक वर्षात दहावीत उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेले माजी विद्यार्थी पंधरा वर्षा नंतर पुन्हा एकत्र आले. त्यांनी संपूर्ण दिवस शाळेत येऊन विविध कार्यक्रम करून विद्यार्थी  दशेतील शालेय आठवणीना उजाळा दिला.  

या मेळाव्याचे आयोजन  माजी विद्यार्थी शुभम नेवे, गुरुदास पाटील, अनिल पाटील, हेमंत बाविस्कर, विजय गवळे, तेजस्विनी पाटील यांनी सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थीनी यांना एकत्र आणले. यानिमित्ताने परिसर सुशोभीत करण्यात आला होता. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील सेवा निवृत मुख्याध्यापक जी व्ही पाटील  होते तर प्रमुख पाहुणे म्हणून येथील संस्थेचे सचिव बाळासाहेब देशमुख होते. सेवा निवृत्त मुख्याध्यापिका  मिनाबाई देशमुख से.नि.मुख्या. के. टी. महाजन,  विद्यमान मुख्या. ए जे कदम, से.नि.क.लि.  हिंमत महाजन, से.नि. शिक्षक एस बी बाविस्कर,  से.ने.प्र.स.प्रमोद देशमुख, कार्यरत शिक्षक एम जी पाटील, आर टी मोरे, आर आर देशमुख, प्र.प. संजय देशमुख, नाईक शांताराम गवळे, शिपाई त्रुषीकेश देशमुख, क.लि.शुभम महाजन आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. 

यावेळी येथील से. नि. मुख्या. कै. वाय एम पाटील, से.नि. व.लि.कै. एस बी देशमुख, उपशिक्षक कै.  बी सी कोळी, शिपाई कै.प्रकाश देशमुख  व माजी विद्यार्थी कै.प्रमोद पाटील, कै.भाऊसाहेब पाटील, कै. माया महाजन आदी दिवंगतांना सर्वानी श्रद्धांजली वाहिली. 

यावेळी सेवा निवृत मुख्याध्यापक जी व्ही पाटील   यांनी माजी सर्व 55 विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेप्रमाणे हातात छडी घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक छडी देऊन  वर्गात बसवले  तसेच मुख्याध्यापक ए जे कदम यांनी    वर्गात   गोष्टी स्वरूपात तासिका घेऊन हसत खेळत मनोरंजन करून शिकविले.  यावेळी आलेल्या मान्यवराचा  शाल, श्रीफळ, बुके व  पुस्तके देऊन माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार केला . 

यावेळी तत्कालीन शिक्षकांनी मनोगतात विद्यार्थाच्या जुन्या आठवणी सांगितल्या. या मेळाव्यात पुणे मुंबई नाशिक सुरत ठाणे वापी परभणी  धुळे जळगांव येथून विविध पदावर सध्या कार्यरत असलेले माजी विदयार्थी व विद्यार्थीनी आले होते    वर्ग मित्रानी कथाकथन कविता अभिनय विनोदी चुटकुले सांगत  स्नेह संमेलनाचा आनंद लुटला  तसेच यात सर्व माजी 55 विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी सहभाग घेतला या सर्वांनी भविष्यात पुढील वाटचालीसाठी  सेल्पी काढत  एकमेकांना शुभेच्छा दिल्या.  

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थीनी तेजस्विनी पाटील यांनी केले तर आभार  माजी विद्यार्थी हेमंत बाविस्कर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व माजी विदयार्थी यांनी सहकार्य केले.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने