" बच्चू भाऊ कडू "यांच्या आंदोलनाला चोपडा शेतकरी कृती समितीचा जाहीर पाठिंबा.. ♦️चोपडा तालुक्याची पैसेवारी ५० पैश्याचे आत लावली पाहिजे तहसीलदारांकडे मागणी

 " बच्चू भाऊ कडू "यांच्या आंदोलनाला चोपडा शेतकरी कृती समितीचा जाहीर पाठिंबा..

♦️चोपडा तालुक्याची पैसेवारी ५० पैश्याचे आत लावली पाहिजे तहसीलदारांकडे मागणी

चोपडा दि.२९(प्रतिनिधी) :- बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाची शासनाने लवकर दखल घेऊन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ जाहीर करावी तसेच तालुक्यातील कापूस,मका, बाजरी  साऱ्या पिकांच्या उत्पादनाची माहिती स्पष्ट करून चोपडा तालुक्याची पैसेवारी ५०पैश्याच्या आत लावली पाहिजे अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचेकडे शेतकरी कृती समितीने केली आहे.

   नागपूर येथील आंदोलन जर लांबले तर  आंदोलनात सहभागी आहेत त्या साथीदारांना अन्नधान्याची गरज पडेल, तशी मदत पाठवण्यासंदर्भात देखील नियोजन चोपडा तालुक्यातील शेतकरी करत आहेत असेही कृती समितीने  स्पष्ट केले आहे 

    यावेळी एस बी पाटील,प्रशांत पाटील ,नारायण पाटील,अमृतराव वाघ,समाधान पाटील,अजित पाटील,धनंजय पाटील,गोकुळ चव्हाण,चंद्रकांत पाटील,शरद पाटील,भगवान पाटील,सुभाष पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी हजर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने