चोपड्यात हिंदु रक्षा समिती तर्फे शस्त्र पूजनाचा कार्यक्रम

 चोपड्यात हिंदु रक्षा समिती तर्फे शस्त्र पूजनाचा कार्यक्रम 


चोपडा दि.०३(प्रतिनिधी )शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या निमित्ताने हिंदु रक्षा समिती तसेच हिंदु जनजागृती समिती तर्फे सायंकाळी 6 वाजता शस्त्र पूजनाचा कार्यक्रम तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. प्रथम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण तहसीलदार भाऊसाहेब थोरात याच्या हस्ते करण्यात आले.समिती तर्फे हिंदु बांधवाना विजयादशमी च्या शुभेच्छा देण्यात येत होते तसेच हिंदुच्या मुली हे मुस्लिम बहुल युवक प्रेमाच्या जाळ्यात ओढत असतात त्याना धडा शिकवण्यासाठी हिवाळी अधिवेशनात लव जिहाद कायदा लागू कराव्या यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली यासाठी हिंदु धर्मभिमानी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन स्वाक्षरी करण्यात आले.

यावेळी चोपडा शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, मनसे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे, धर्मेद्र सोनार,राष्ट्रवादी शहरप्रमुख शाम परदेशी,गोविंद मराठे,शिवसेना माजी शहर प्रमुख आबा देशमुख, नगरसेवक राजाराम पाटील, गजेंद्र जयस्वाल, डॉ. महेंद्र पाटील,सागर ओतारी,नरेश महाजन, डॉ. रोहन पाटील, डॉ. दुर्गेश जयस्वाल, सुनिल बरडिया, शैलेश बरडिया अजय अग्रवाल,बबलू पालीवाल,प्रफुल्ल स्वामी, राजेंद्र स्वामी,भाजपा तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील,हिंदु रक्षा समिती चे यशवंत चौधरी, भगतसिंग पाटील, हिंदु जनजागृती समिती चे अनिल पाटील, सुधाकर चौधरी, किशोर दुसाने,प्रदीप बारी,तुषार सूर्यवंशी यासह शेकडोच्या संख्येने हिंदुधर्माभिमानी यांनी शस्त्रपूजन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने