सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पाणी बॉटल वाटपाचा शुभारंभ..
चोपडा दि.१०(प्रतिनिधी) : ना. बाबासाहेब पाटील (सहकार मंत्री महा. राज्य )चोपडा जिल्हा जळगाव दौर्यावर आले असतांना सुनिल पाटील (वाळकी, चोपडा ) जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व माजी जि. प. सदस्य जळगाव ह्यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देउन उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने द्वीमासीक कार्यक्रम अंतर्गत सुनिल पाटील, वाळकी ह्यांच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थ्यांना शाळेत घरुन शुध्द व थंड पाणी नेता यावे म्हणुन १००० पाणी बाटल्या वाटपाचा शुभारंभ मंत्री बाबासाहेब पाटील ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
१००० वटवृक्षांची लागवड अजित दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लागवड सुनिल पाटील ह्यांनी चोपडा तालुक्यात केल्या बद्दल ना. बाबासाहेब पाटील ह्यांनी सुनिल पाटील ह्यांचे कौतुक केले.त्या प्रसंगी माजी मंत्री अनिल दादा पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार, रावेर जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे,जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, जिल्हा बँक म संचालक इंदिराताई पाटील, जिल्हा बँक संचालक तिलोत्तमा ताई पाटील, ग्रथांलय प्रदेशाध्यक्ष रिटाताई बाविस्कर, सा. न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष गिरीश देशमुख,सा. न्याय तालुका अध्यक्ष साळुंखे सर, सा. न्याय शहर अध्यक्ष मिलिंद सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष परेश देशमुख,अल्पसंख्यांक विभागाचे अक्रम तेली, नोमान काझी, जियोद्दीन काझी, नजिर काझी, दानेश, जमिल कुरेशी, आदिवासी विभागाचे नामा पावरा, रामचंद्र पावरा, असंघटीत कामगार जिल्हाध्यक्ष रमाकांत बोरसे,किशोर दुसाने, सचिन सांगोरे तसेच तालुक्यातील सरपंच व वि का से सोसायटी चेअरमन व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.