दि चोपडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बॅकेचे घोडगाव शाखेचे उद्घाटन
चोपडा,दि.१०(प्रतिनिधी) : येथील दि चोपडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बॅकेचे तालुक्यातील घोडगाव येथे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. जवळ जवळ १०७ कोटींची उलाढाल करण्यार्या दि चोपडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बॅकेचे उद्घाटन करण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री आज जळगाव जिल्ह्यात आले होते.
या कार्यक्रमात विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण भाई गुजराथी, मदत व पुनर्वसन माजी मंत्री अनिल पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, जळगाव जिल्हा बॅकेचे चेअरमन संजय पवार, पिपल्स बॅकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, व्हॉईस चेअरमन सुनिल जैन यांच्या सह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सहकार क्षेत्रात राजकीय चप्पल बाहेर काढून सहकार वाचविणे फार महत्वाची गरज आहे. असे आवाहन माजी विधानसभेचे अध्यक्ष अरूण भाई गुजराथी यांनी या प्रसंगी केले. चोपडा पीपल्स बॅकेच्या वतीने महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांना मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक लाखाचा चेक सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कडे सुपूर्द केले.