चोपडा कृषि तंत्र विद्यालयात विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ऍप वर कार्यशाळा संपन्न..
चोपडा दि.११(प्रतिनिधी) :शेतीच्या दैनंदिन हवामान बदल तसेच बाजारपेठेतील दैनंदिन मालाला भाव संदर्भात माहिती आणि विविध माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानाचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून कृषी विभागाकडूनअत्याधुनिक तंत्रज्ञान युगातील `महाविस्तार एआय'* हे ऍप विकसीत करण्यात आलेले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधीत सर्व प्रकारच्या माहिती तसेच गरजा पूर्ण करण्यासाठी व विद्यार्थ्यांना शेती अभ्यास विषयक उपयुक्त असणारे सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी मराठीत उपलब्ध असलेले हे ऍप फार लाभदायक ठरणार आहे. अशी माहिती तालुका कृषि अधिकारी श्री. डी.बी. साळुंखे यांनी आयोजित कार्यशाळेस संबोधित करतांना दिली.
सदरील कार्यशाळा कृषि विभाग, चोपडा व चोपड़ा एज्युकेशन सोसायटी संचलित कृषि तंत्र विद्यालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडली.
यावेळी कृषी सहायक श्री.दिनेश पाटील, श्री.सनेर संस्थेचे समन्वयक श्री.गोविंद गुजराथी,श्री.डी.टी.महाजन तसेच कृषि तंत्र विदयालयाचे प्राचार्य श्री हरिश्चंद्र पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री.निलेश धनगर,श्री.मनोहर पाटील,श्री.मोहन चौधरी,श्री रवींद्र चव्हाण,श्री.सौरभ गुजराथी,श्री.आर आर महाले, आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन श्री.चंपालाल पवार यांनी तर आभार प्रदर्शन मनोहर पाटील यांनी केले .