अडावद येथील वनश्री दशरथ पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त स्नेही जणांकडून सत्कार

 अडावद येथील वनश्री दशरथ पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त स्नेही जणांकडून सत्कार


अडावद ता.चोपडा दि.११(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने सन्मानीत श्रीक्षेत्र उनपदेव येथील वनमजुर दशरथ दौलत पाटील हे आपल्या वनविभागातील ४० वर्षाच्या प्रदीर्घ कार्यकाळानंतर सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांच्या स्नेहीजनांकडून त्यांनी सेवा बजावलेल्या ऊनपदेव या कार्यस्थळी अनोख्या पद्धतीने सेवानिवृत्तीच्या सत्कार आणि निरोप समारंभ सोहळा साजरा करण्यात आला.

            याप्रसंगी सत्कारमूर्ती दशरथ पाटील यांच्या समवेत दोन तपांपेक्षाही जास्त काळ सोबत असणाऱ्या मित्रमंडळींनी त्यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत स्नेहपूर्वक भेट प्रदान करीत त्यांच्या स्नेहपूर्वक सत्कार केला आणि सेवानिवृत्ती काळा नंतरच्या आयुष्यास शुभेच्छा दिल्यात. यावेळी सर्वश्री पी.आर.माळी, जितेंद्रकुमार शिंपी,गणेश परदेशी , जितेंद्र परदेशी,राहुल बैरागी,अमोल कासार,अतुल महाजन, प्रदीप पाटील, संभाजी पाटील,संजय पाटील, पंकज बैरागी,लक्ष्मण पाटील ,रमेश धनगर, राजेंद्र जैन, अशोक देशमुख, दिनेश बैरागी, रविंद्र लोहार,सुनील धनगर आदींसह मोठ्या संख्येने वनश्री दशरथ पाटील यांच्या स्नेही मंडळींचा गोतावळा उपस्थित होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने