नागलवाडी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

 

नागलवाडी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न


चोपडा दि.३०(प्रतिनिधी):दि. 29/8/2025 रोजी नागलवाडी केंद्राची शिक्षण परिषद क्र. 2 वि. प्र. देशमुख आश्रम शाळा कर्जाने येथे गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी  अजित पाटील , केंद्रप्रमुख देवेंद्र पाटील, समावेशित तज्ज्ञ रविराज शिंदे व केंद्रातील सर्व शिक्षक  बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.
परिषदेची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.

प्रास्ताविकातून केंद्रप्रमुख देवेंद्रजी पाटील यांनी निपुण चाचणी चा केंद्रातील शाळांचा आढावा सादर केला.गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुर्वे मॅडम यांनी नवभारत साक्षरता अभियान, एक पेड माँ के नाम, मोफत गणवेश, यु डायस कामकाज इ. विषयांचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.30 सप्टेंबर 2025 पर्यंत 100% विद्यार्थी निपुण करणेसाठी शिक्षकांनी सूक्ष्म नियोजन करावे असे आवाहन केले.
शिक्षण परिषदेत मागील महिन्यातील शैक्षणिक अनुभव या विषयावर ऋषिकेश धनगर  (जिरायत पाडा), माझा वर्ग माझे नियोजन या विषयावर सुनील भोई ( बोरअजंटी), शिरसाठ सर (नागलवाडी), विद्यार्थी पोर्टफोलिओ या विषयी आधार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने