चहार्डी ग्रामपंचायत उपसरपंचपदी हर्षदा कोळी यांची बिनविरोध निवड
चहार्डी,ता.चोपडा दि.३०(प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील ग्रामपंचायत उपसरपंच सौ. मनीषा निंबा शेटे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्या नंतर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच चंद्रकलाबाई दत्तात्रय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले त्यात हर्षदा भूषण कोळी यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
हर्षदा कोळी ह्या माजी जिल्हा परिषद सदस्य रायसिंग आण्णा यांचा सून असून तालुका व्यवस्थापक भूषण कोळी यांचा पत्नी आहेत. हर्षदा कोळी यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य कार्यकाळात त्यांच्या वार्डातील आणि गावातील घरकुल, रेशन कार्ड, वयक्तिक शौचालय, जेष्ठ नागरिक, विधवा, अपंग पेन्शन योजनेवर खूप मोठे काम केले आहे
या निवड प्रसंगी डॉ अनिल पाटील, गणेश पाटील, दिनकर पाटील, अर्जुन कोळी, किरण मोरे, न्यानेश्वर पाटील, जयश्री पाटील, माधुरी पाटील, मनीषा शेटे, अल्काबाई भिल, चंद्रकलाबाई पाटील सरपंच, हर्षदा कोळींसह बारा सदस्य उपस्थित होते.त्यांच्या निवडीबद्दल माजी जि. प. सदस्य रायसिंग आण्णा,माजी सरपंच अशोक दगडू पाटील,माजी सभापती मालुताई कोळी, मयूर सोनवणे, अजय कोळी, भागवत मोरे, रघुनाथ वारडे, श्रीराम सेना सर्व सदस्य, चोसाका माजी संचालक निलेश पाटील आदींनी सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.