तळफळत "गाय " माय मरतांना झाली बेवारस .! अन् सच्चा गोसेवक दफनविधीचा झाला वारस ..!! ♦️जनावरे पाडणाऱ्यांनो जर तुम्ही त्यांची देखभाल करू शकत नसाल तर पाडू नका.. विना कारण पापाचं खापर डोक्यावर फोडू नका.. ललित कोळींचे आवाहन

 तळफळत "गाय " माय मरतांना झाली बेवारस .!  अन्  सच्चा गोसेवक दफनविधीचा झाला वारस ..!!

♦️जनावरे पाडणाऱ्यांनो जर तुम्ही त्यांची देखभाल करू शकत नसाल तर  पाडू नका.. विना कारण पापाचं खापर डोक्यावर फोडू नका.. ललित कोळींचे आवाहन 

चोपडा दि.३१(प्रतिनिधी ) :- जनावरे पाडणाऱ्यांनो जर तुम्ही त्यांची देखभाल करू शकत नसाल तर  पाडू नका.. गोमातेला आपण ३३ कोटी देवतांचा वास असल्याचे धनी मानतो अन् तिला मात्र उघड्यावर सोडून देतो याला आपण काय म्हणावे..!  हिंदू धर्मात गाईला मातेसमान पूजतो अन् आपल्याच आईला (गाय )मोकाट सोडण्याचा हा कुठला प्रकार म्हणावा हे कोडं न उमगणारे असेच आहे.आपल्यात धमक नसेल पाडू नका पण्  बिचारीला असं बेवारस होऊ देऊ नका.. नाहीतर  मोठ्या पापाचं घोंगड  निश्चितच तुमच्या डोक्यावर आदळल्या शिवाय राहणार नाही असे उद्गीग्न विचार गोसेवक ललित कोळी या युवकाने व्यक्त केले आहे.

दोन  दिवसांपूर्वी एक वासरी पडली होती... तिच्या पायाला किडे लागले होते, पोट फुगून गेले होते आणि ती यातनांनी तडफडत होती. पण तिचा कोणी च वाली पुढे आला नाही, साधी दखलही घेतली नाही. तिचा पाय झटकण्याचा तळफळाट कोणीच बघायला आला नाही . मन गहिवरणारा हा प्रसंग बे- वारस आई सारखा वाटू लागला तिच्या डोळ्यातला तो जीवनाचा "शेवट" आसवांना वाट मोकळी करणारा होता.मालकाचा कुठेच तपास नव्हता. लोकांना फक्त प्राण्यांचा उपयोग हवा असतो तो फायद्या पुरताच ..दुध देईल,  लाभ होईल  तोपर्यंतच काळजी.. अन् संकटात ,आजारात मोकाट.. हा कुठला माणूस म्हणावा असा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर येऊन उभा ठाकला. हा दूर्दैवी प्रसंग पाहून मी गोसेवेच्या कार्यात असल्याने धावत पोहचलो. डॉक्टरांना बोलावलं पण तोवर वासरीने शेवटचा श्वास घेतला होता. मन खिन्न झालं ..उदास झालं.वाटल की या वासरूचा कोणी तरी धनी रात्रीपर्यंत येईल पण उलट झालं.. सकाळ होऊन सूर्य देवाने हजेरी लावली होती पण   कोणीच पठ्ठा पुढें आला नाही.ती माय तिथेच पडून होती. शेवटी मीच JCB वाल्यास बोलावून तिला पुरलं... तेव्हा मनात अनेक विचारांचं काहूर उठलं "पशु" ही  जीव आहे, मग मानव स्वतःच्या स्वार्थापायी का इतका कठोर झाला असावा ". जनावरांच्या उरावर बसून स्वतः धनी बनतो.. मज्जा करतो .संकटसमयी वृध्दापकाळी मात्र पाठ दाखवितो . म्हणून अशांच्या विचारांची कीव करावीशी वाटते.. अन् कर्मट शब्द बाहेर पडतात..वागायची धमक नाही तर जनावरें कशाला पाडतो..!तेही सजीव आहेत, त्यांनाही वेदना होतात, त्यांनाही प्रेमाची गरज आहेअसं मतही ललित कोळी याने व्यक्त केले.या वासुरुच्या अंत्यसंस्कार दफनविधीच्या  दुःखद प्रसंगी गोसेवक राज भिल, हर्षल चौधरी , निलेश महाजन यांनीही मदतीचा दिला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने