ज्या महाविद्यालयातून जीवनाची सुरुवात केली,त्याच महाविद्यालयात निवुत्तीनंतर सत्काराला गहिवरले माजी पोलीस अधीक्षक श्री अर्जुन सोनवणे



ज्या महाविद्यालयातून जीवनाची सुरुवात केली,त्याच महाविद्यालयात निवुत्तीनंतर सत्काराला गहिवरले माजी पोलीस अधीक्षक श्री अर्जुन सोनवणे

दोंडाईचा,दि.३१(प्रतिनिधी)- परीस (पारस) स्पर्श बाबत आजच्या पिढीतील अनेक लोक अनभिज्ञ आहेत.परीस (पारस) स्पर्श म्हणजे गंज लागणाऱ्या लोखंडालाही एखाद्या परीसचा स्पर्श झाला तर त्याचे रूप सोने होत व किमंत शंभरपटीने वाढत जाऊन भावात चकाकी येत असते,असे अनेक वर्षापासुन बोधकथेत म्हटले गेले आहे व आजच्या काळात परीस स्पर्श जरी पहायला-ऐकायला मिळत नसला तरी परीस स्पर्श प्रत्येकाच्या जीवनात कोणाच्या नी कोणाच्या सहवासातून येत असतो.मग तो परीस स्पर्श हा आई-वडील-भाऊ-बहीण-मित्र-मैत्रीण-प्रेयसी-प्रियकर- गुरूवर्य मार्गदर्शक आदी रूपातुन कोणी ना कोणी व्यक्ती हे भेटत माणसाचे आयुष्य बदलून टाकत-हातभार लावत,यश-प्रगतीचे कारण बनत असतात व माणूसही अशा परीस स्पर्शाला जीवनात शेवटपर्यंत न विसरता,त्याच्या आठवणी जपत-ऋण मानत  जीवनाला धार देत इतरांना अनुभव सांगत जीवन कलाटणीचा मार्ग दर्शवत असतात आणि आज येथे अशाच सर्वसामान्य कुटूंबात जन्मलेल्या-काबाडकष्ट व मेहनतीच्या जोरावर-जोडीला परीस स्पर्श आपल्या जीवनात लाभल्यावर शिपाई पदापासुन जिल्हा पोलीस प्रमुख पदापर्यंत यश-किर्ती कशी मिळवली,याची माहिती सेवा निवृत्त माजी जिल्हा पोलीस प्रमुख श्री अर्जुनराव सोनवणे यांनी ज्या महाविद्यालयातून जीवनाची सुरुवात केली, त्याच महाविद्यालयात निवूत्तीनंतर सत्काराला बोलावल्यावर-उत्तर देताना गहिवरून जाऊन आपल्या जीवनात माजी मंत्री माननीय डॉ.नानासाहेब हेमंतराव भास्करराव देशमुख यांनी कसे परीस (पारस) स्पर्शाची भुमिका निभावली याची इतमभूत कथा-माहिती महाविद्यालयीन प्राचार्य व प्राध्यापक कर्मचारी यांच्या जवळ व्यक्त केली आहे.

सदर सत्कार समारंभाचे कारण असे की,नुकतेच नासीक येथे स्थायिक व मुळचे दोंडाईचा येथील रहिवासी सेवा निवृत्त माजी जिल्हा पोलीस प्रमुख श्री अर्जुनराव सोनवणे साहेब हे काही व्ययक्तीक कामानिमित्त दोंडाईचा येथे आल्या असल्याची माहिती पार्वताबाई बागल कला व वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयास मिळाली.त्यांनी तातडीने कमी वेळात आमंत्रण देत सत्कार व भेटीच्या कार्यक्रमाचे नियोजन केले.जेणेकरून नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना काही प्रोत्साहन मिळेल ह्या शुद्ध हेतूची मांडणी त्यांनी सोनवणे साहेबांजवळ व्यक्त केली व सोनवणे साहेबांनीही भारावून जात तात्काळ सत्कार महाविद्यालय भेट कार्यक्रमाला होकार दर्शवला.यावेळी पी.बी.बागल महाविद्यालयात त्यांचे स्वागत बालपणीचे मित्र तथा ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संस्थेचे चेअरमन डॉ.बापूसाहेब रविन्द्र देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाशजी लोहार सर, ज्येष्ठ प्राध्यापक प्रा.डाॅ.एन.एल.वाल्हे सर,प्रा.विश्वास पाटील सर, प्रा . डॉ.प्रविण पाटील,माजी बांधकाम सभापती श्री महेन्द्र पाटील,माजी सभापती श्री भुपेन्द्र धनगर व महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर मंडळी यांनी केले.यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ बापूसाहेब रविन्द्र देशमुख यांनी प्रास्ताविकात बालपणीचे मित्र श्री अर्जुन सोनवणे साहेब यांच्या संघर्षमय जीवनाची माहिती उपस्थितांना दिली.तसेच सोनवणे साहेब यांनी अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधत महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या विविध विभागांची माहिती घेतली व महाविद्यालयाची आजची शैक्षणिक प्रगती पाहून,काॅलेजला नॅकचा बी ग्रेडचा दर्जा मिळाल्याचे पाहून प्राचार्य डॉ.प्रकाश लोहार यांचे समाधान व्यक्त केले .

तसेच ज्या महाविद्यालयातून जीवनाची सुरुवात केली त्याच महाविद्यालयात निवुत्तीनंतर सत्काराला उत्तर देताना गहिवरून जाऊन आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,माझे जीवनाचे परीस-मार्गदर्शक-गुरूवर्य माजी मंत्री डॉ.नानासाहेब हेमंतराव देशमुख हे जेव्हा वैद्यकीय व्यवसाय बरोबर सत्तरच्या दशकात राजकारणात आले.त्यावेळी त्यांनी शहर व परिसरातील गोर-गरिबांच्या मुलांना कमी खर्चात शिक्षण मिळावे म्हणून पार्वताबाई बागल कला व वाणिज्य महाविद्यालयाची सुरूवात केली.त्यावेळी मी ही एस.वाय.बी.ए.ला ॲडमिशन घेतले व नानासाहेब देशमुख हे जुन्या नगरपालीकेसमोर अर्थात माझ्या घरापासुन जवळच राहत असल्याने माझे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरू झाल्याने, त्यांच्या घरी असलेली पुस्तकांची भली मोठी लायब्ररी व नानासाहेबांची वैद्यकीय व्यवसायातील छबी,राजकारणातील हुशारी आदी गुणांनी भारावून गेलो व आपणही एकदिवशी असे नावाजलेले व्यक्तीमत्व बनावे असे मनाशी ठरवले व दररोज संपर्कात आल्यामुळे,नानासाहेबांनीही माझ्यातली अभ्यास-खेळाडूवुर्ती ओळखली व मला नॅशनल लेवल पर्यंत संधी उपलब्ध करून दिली व त्यासोबत मला महाविद्यालयात शिपाई पदावर कार्यरत केले. मीही अभ्यासात मेहनत घेत जिद्द चिकाटीसह त्या सोबत खेळण्याचा छंद जोपासत,शिक्षण चालू ठेवले.एकदिवशी नासीक पी.टी.सी.सेंटर मधुन काॅल आला.त्यावेळी नानासाहेब देशमुखांनी परीस स्पर्शाची-मार्गदर्शकाची भुमिका निभावत मला सिलेक्शन होईपर्यंत साथ दिली व आज मी पोलीस खात्यात नासीक, मुंबई, कोल्हापूर, नांदेड आदी ठिकाणी जनतेला प्रामाणिकपणे सेवा देत जिल्हा पोलीस प्रमुख पदापर्यंतचे यश-किर्ती मिळवली.ऐवढ्या तीस बत्तीस वर्षात भष्टाचाराची कीड अंगी लागू न देता प्रामाणिकपणे पगारावर संतुष्ट राहून जनतेला त्यांच्या हक्कांची सेवा दिली आहे.त्यामुळे आज निवुत्त होऊन बावीस वर्षं झाले तरी शरीराने व मनाने तंदुरुस्त आहे व एक नया पैशाचे दु:ख नाही आहे.दोघे मुले उच्च शिक्षीत चांगल्या पदावर कार्यरत आहे.त्यामुळे नानासाहेब सारख्या परीस स्पर्शाची माझ्या जीवनाला जी जोड मिळाली.त्यामुळे मी माझे व परिवाराचे नाव-किर्ती-यश-प्रगती करू शकलो.म्हणून आजच्या जीवनात परीस (पारस) स्पर्श कुठे शोधायला जायची गरज नाही आहे.जर प्रत्येकाने आपल्या जवळपास शोधले तर देवाने नक्की कोणी ना कोणी आपल्या जीवनात परीस स्पर्शाची भुमिका निभावणारा उभा-निर्माण केलेला असतो.फक्त ती व्यक्ती-वेळ-परिस्थिती आपल्याला समजून घ्यायची असते,असे शेवटी त्यांनी गहिवरून सांगितले.यावेळी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.विश्वास पाटील यांनी व्यक्त केले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने