नागलवाडी येथील माध्यमिक विद्यालय शाळेत साने गुरुजींची कथामाला
चोपडा दि.३०(प्रतिनिधी) तालुक्यातील नागलवाडी येथील माध्यमिक विद्यालय शाळेत साने गुरुजी कथामालेचे पहिले पुष्प गुंफण्यात आले.सर्वप्रथम पू. साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मुख्याध्यापक पी. डी. पाटील तसेच प्रताप विद्या मंदिर शाळेचे उपशिक्षक श्री. विजय गोसावी आणि सहकारी शिक्षक बंधूच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थिनींनी साने गुरुजींची "बलसागर भारत होवो "या गीताचे सादरीकरण केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय शाळेचे उपशिक्षक श्री.नवनीत राजपूत सरांनी करून दिला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. डी. पाटील यांनी या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. *या कथामालेचे पहिले पुष्प गुंफण्याचा मान प्रताप विद्या मंदिर शाळेचे विद्यार्थी प्रिय शिक्षक आ.श्री.विजय गोसावी यांना देण्यात आला. सरांनी आपल्या कथामालेच्या मनोगतातून साने गुरुजी यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. मुलांनी साने गुरुजी यांचे विचार कृतीतून दाखवून द्यावेत हा संदेश दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दीपक राजपूत यांनी तर आभार श्री.एस.पी.बऱ्हाटे सरांनी केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक बंधू, भगिनी, लेखनिक कर्मचारी उपस्थित होते.