दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन व बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर वर्कशॉप


दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन व बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर वर्कशॉप

चोपडा दि.३०(प्रतिनिधी)आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉक्टर सुरेश जी पाटील महाविद्यालयातील पीजी डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स व रिसर्च सेंटरच्या मार्फत वाणिज्य मंडळाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाप्रसंगी शहरातील बँक ऑफ बडोदा चे मॅनेजर श्री. मनीष गौरखेडे व सहाय्यक मॅनेजर श्री .रोहित पाटील यांचे  सरकारी बँकांमधील करिअरच्या संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. के. एन .सोनवणे, तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एन .बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी .सूर्यवंशी, विभाग प्रमुख डॉ. सी .आर. देवरे हे उपस्थित होते.

   कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी व प्रमुख मार्गदर्शक श्री. मनीष गौरखेडे यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी यावर मार्गदर्शन करत असताना आयबीपीएस परीक्षा व वाणिज्यचे विद्यार्थी यांचा खूपच जवळचा संबंध असतो असे प्रतिपादन केले. बँकिंग करिअर बद्दल व बँकिंगच्या परीक्षेचा अभ्यास करताना कोणत्या बाबींवर विशेष व प्रकर्षाने लक्ष दिले पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन करताना त्यांनी शैक्षणिक कर्ज सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध योजना याबद्दल देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच दुसरे प्रमुख अतिथी सहाय्यक मॅनेजर श्री रोहित पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांनी बँकिंगच्या परीक्षेकडे पाहताना एक महत्त्वाचा हेतू डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे सांगितले. तसेच वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना बँकिंग करिअर क्षेत्रामध्ये खूपच जास्त वाव आहे. असे प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. आर. एन .बागुल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वाणिज्यच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व क्षेत्रातील करिअरच्या संधी ओळखून मोठ्या प्रमाणावर यश संपादित केले पाहिजे. तसेच वाणिज्यला आज अतिशय चांगल्या प्रकारची मागणी सर्व समाज माध्यमांमध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे वाणिज्य च्या विद्यार्थ्यांसमोर  नवीन नवीन पर्याय उपलब्ध झालेले आहेत असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात बोलत असताना वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी आर .देवरे यांनी वाणिज्य मंडळ उद्घाटन व वाणिज्य मंडळ स्थापना यामागे असलेली उद्दिष्टे व मंडळ अंतर्गत घेण्यात येणारे विविध कार्यक्रम हे कशा प्रकारचे असतात व काय हेतू असतो याबद्दल सविस्तर मांडणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. श्री प्रवीण जैन यांनी केले. तसेच आभार सौ .एच. सी. देवरे यांनी मांडले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख श्री व्हि.पी हौसे , श्री .सी.पी .बाविस्कर, मिस. भाविका गुजराथी, मिस. योगिनी पाटील व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने