बटेसिंगभैय्या रघुवंशी विधी महाविद्यालयात कायदा साक्षरता कार्यशाळा संपन्न

 बटेसिंगभैय्या रघुवंशी विधी महाविद्यालयात कायदा साक्षरता कार्यशाळा संपन्न

♦️भारतातील नागरिकास कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक-न्या.श्री किशोर पेठकर

नंदुरबार,दि.३०(प्रतिनिधी):- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या  आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या सहकार्याने नंदुरबार तालुका विधायक समितीचे श्री बटेसिंगभैया रघुवंशी विधी महाविद्यालय कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था नंदुरबार येथे कायदा साक्षरता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली आहे.

यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री किशोर पेठकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्या.श्री. महेंद्र पाटील, अतिरिक्त सरकारी वकील ॲड.महेश पाडवी, संस्थेचे चेअरमन मा.आ.श्री. चंद्रकात रघुवंशी उपस्थित होते

सदर उद्घाटन पर मनोगतात मा.न्या.श्री किशोर पेठकर यांनी कायद्याचे ज्ञान हे प्रत्येक भारतीय नागरिकास असणे आवश्यक असून विधी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कायदा जागरूकता करणे आवश्यक असून वकील झाल्यानंतर समाजाचा प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी नंदुरबार सारख्या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये विद्यापीठ व विधी महाविद्यालयाने कायदा जागरूकता कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले. संस्थेचे चेअरमन मा.आ. श्री चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार या मागासलेल्या जिल्ह्यात कायदा शिक्षण व कायदा जागरूकता व्हावी या दृष्टीने महाविद्यालयाची स्थापना केल्याचे प्रतिपादन केले. मा. न्या. श्री महेंद्र पाटील यांनी कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात विधी सेवा प्राधिकरण हे भारतीय समाजातील दुर्बल घटकांना मोफत आणि सक्षम कायदेशीर मदत देण्यासाठी १९८७ च्या विधी सेवा प्राधिकरण कायदे अंतर्गत स्थापन करण्यात आलेली संस्था असून समाजातील प्रत्येक दुर्बल घटकांपर्यंत मोफत न्याय मिळवून देण्याचे काम प्राधिकरणाद्वारे केले जाते व या प्राधिकरणाचा उपयोग जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तसेच शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कायदा सहाय्यता योजनांबद्दल त्यांनी माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यांनी कायदा साक्षरता ही व्यक्तीच्या जीवनात प्रत्येक पैलूवर आवश्यक असून अगदी मोबाईल वापरापासून ते रस्त्यावर चालण्यापर्यंत लागू असलेल्या कायद्यांची माहिती सामान्य नागरिकांना आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून कायद्याचे पालन करणारे जबाबदार नागरिक होण्याची अपेक्षा व्यक्त केली. दुसऱ्या सत्रात अतिरिक्त सरकारी वकील ॲड. महेश पाडवी यांनी फौजदारी कायदे अंतर्गत येणाऱ्या विविध व्याख्या तसेच संशयित व्यक्तीच्या अटकेपासून तर खटल्यापर्यंतच्या प्रक्रिया तसेच दोषी आढळल्यास त्यास दिल्या जाणाऱ्या शिक्षा व त्याचे पुनर्वसन प्रक्रियेबद्दल सखोल मार्गदर्शन केले. 

सदर कार्यशाळेची प्रस्तावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन. डी. चौधरी यांनी केली तर कार्यशाळेचे नियोजन महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा.डॉ.एस एस हासानी यांनी केले. सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या विद्यार्थी राधेय जोशी यांनी केले. कार्यशाळेत शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने