अडावद-उनपदेव सुरू करा बिरसा बिग्रेड संघटनेची मागणी

 

अडावद-उनपदेव सुरू करा बिरसा बिग्रेड संघटनेची मागणी

चोपडा दि.२४(प्रतिनिधी) आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक  दृष्ट्या येण्या जाण्यास कोणतेही वाहन नसल्याने उनपदेव ते अडावद बस चालू करावी   शिवाय पाच वर्षाच्या विद्यार्थ्याला "पास" संपल्याच्या  कारणाने अर्ध्या रस्त्यातच उतरून उर्मट वागणूक  देणाऱ्या कंडक्टरवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी बिरसा ब्रिगेड सातपुडा या आदिवासी संघटनेने डेपो मॅनेजर महेंद्र पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
आदिवासी विद्यार्थी बादल राजाराम बारेला हा अडावद शाळेत  इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत आहे. तो दररोज एसटी बसने शाळेत प्रवास करीत आहे त्याची मासिक पास 17/8/2025 रोजी संपली होती.परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने त्याच्याकडे पास काढण्यासाठी पैसे नसताना तो नेहमी प्रमाणे  दि. 19/8/2025  रोजी सकाळी शाळेत जात असताना, त्याचा मासिक बस पास संपल्याच्या  कारणाने बस  कंडक्टरने त्याला अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन नाबालिक मुलाला गावापासून सुमारे ३ ते ४ किलोमीटर अंतरावर निर्जन ठिकाणी भर पावसात गाडीतून खाली उतरण्यास भाग पाडले. बस नियम जरी बालकाने मोडला तरी त्याला सहानुभूतीपूर्वक समज देऊन  गाडी खाली एकट्या लहानशा बाळाला उतरायला नव्हते व जातीवाचक अपशब्द बोलायला नव्हते तरी कंडक्टरची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.तसेच अडावद -उनपदेव ही बस सेवा सुरु करावी अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर प्रमोद भाया बालेला,नामा पावरा,रामदास पावरा, सुंदरलाल पावरा  आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने