उमर्टी येथे कृषी विभागामार्फत सोयाबीन पिकावर शेती शाळेचे आयोजन

 उमर्टी येथे कृषी विभागामार्फत सोयाबीन पिकावर शेती शाळेचे आयोजन

गणपूर ,ता चोपडा) दि.23 (प्रतिनिधी):  सातपुडा पर्वत रांगेतील उमर्टी (ता चोपडा) येथे चोपडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सोयाबीन या पिकावरील शेती शाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ही शेती शाळा घेण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी दीपक बी साळुंखे होते.

यावेळी सोयाबीन पिकावरील रोग,पिकाच्या अवस्था, निगा कशी घ्यावी त्याचबरोबर सोयाबीन पिकाचा कालावधी आणि वाढी बाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेती शाळेला आदिवासी भागातील पुरुष व महिला उपस्थित होते. त्यांनी निरीक्षणे व सादरीकरणात सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला उप कृषी अधिकारी चेतन बी साळुंखे, सहाय्यक कृषी अधिकारी एस पी शिंदे व प्रदीप डी फुके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.........

उमर्टी (ता चोपडा) शेती शाळेत सोयाबीन पिकात निरीक्षण करताना अधिकारी व शेतकरी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने