विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कॅरम या स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड

 विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कॅरम या स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड 


चोपडा दि.३१(प्रतिनिधी):- शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धा यामध्ये दिनांक 30/08/2025 रोजी पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चोपडा या ठिकाणी विविध वयोगटातील मुले यांच्या  कॅरम*  खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेमध्ये *विवेकानंद विद्यालय  चोपडा* येथील मुलांच्या  U14 व U 17 वयोगटातील  मुलांनी शिरपेचात मानाचा तुरा रोवत 14 व 17  वर्षे वयोगटात मुलांमधून चोपडा तालुक्यातून पाच मुलांचे जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे १) मोहम्मद लबीब शेख इमरान मणियार   U14 तालुक्यातून प्रथम

२)इक्राम इमरान तेली U14तालुक्यातून तृतीय

३)सिद्धांत राजेंद्र चौधरी U14 तालुक्यातून चतुर्थ मुलांच्या

17 वर्षे वयोगटातील निकाल

१)आर्यन दीपक मेंढे  U17तालुक्यातून द्वितीय

२)रोहन दिनेश चौधरी U17तालुक्यातून चतुर्थ 

या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे

 त्यांच्या  यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सचिव, तसेच सर्व पदाधिकारी व विद्यालयाचे विभाग प्रमुख , मुख्याध्यापक, व मुख्याध्यापिका, सर्व अधिकारी वर्ग तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी त्याचे अभिनंदन केले. त्यांना क्रीडाशिक्षक विजय पाटील सर वआर. पी .आल्हाट सर  यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने