समाजकार्य आणि कला व वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
चोपडा,दि.३१ (प्रतिनिधी)- येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय आणि कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने युनिक अकॅडमी, जळगाव यांच्या सहकार्यातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पदवी काळात स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी ? या विषयावर मार्गदर्शनपर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर होते, प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.आशिष गुजराथी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून युनिक अकॅडमीचे साधन व्यक्ती नारायण पाटील, युनिक अकॅडमीचे समन्वयक नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.भगिनी मंडळाच्या संस्थापिका स्व.सुशिलाबेन शहा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ.मारोती गायकवाड यांनी केले,आपल्या व्याख्यानातून नारायण पाटील यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी पाचवी ते बारावीपर्यंतची सर्व क्रमिक पुस्तके, दैनिक वर्तमानपत्र वाचन तसेच सातत्यपूर्ण अभ्यास, स्वतः नोट्स काढणे, चालू घडामोडींचा आढावा, कृषी व क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे वाचन करून स्वतः अपडेट राहिल्यास स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळते असे त्यांनी पटवून दिले.
कार्यशाळेचे समन्वयक प्रा.अनिल बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले, कार्यशाळेला समाजकार्य महाविद्यालय आणि कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद यांच्यासह २५० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.सदरील कार्यक्रम महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल येथे संपन्न झाला.