चोपडा तंत्रनिकेतनास 'उत्कृष्ट' (Excellent) मानांकन प्राप्त !

 

चोपडा तंत्रनिकेतनास 'उत्कृष्ट' (Excellent) मानांकन प्राप्त !

चोपडा दि.२(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून श्रीमती शरदच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजीनियरिंग अँड पॉलीटेक्निक) चोपडा यांना उत्कृष्ट मानांकनाचा दर्जा प्रदान करण्यात आला. 

तंत्रनिकेतनाच्या उन्हाळी सत्रात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई च्या वतीने बाह्य आवेक्षण समिती पाहणी करण्याकरिता आली असता कमिटीने शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे यश, प्रयोगशाळा सुविधा, अध्यापन गुणवत्ता, शैक्षणिक व्यवस्थापन, प्लेसमेंट, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा आणि त्यांचा होणारा पुरेपूर वापर या सर्व बाबींची पाहणी केली. त्या आधारावर चोपडा तंत्रनिकेतनाने सर्वच बाबींमध्ये उत्कृष्ट स्तर गाठला आहे असे अधोरेखित झाले.
"संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब अँड संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव  ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन, प्राध्यापक व इतर सहकार्यांचे सहकार्य यामुळेच श्रीमती शरदच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजीनियरिंग अँड पॉलीटेक्निक) चोपडा 'उत्कृष्ट' मानांकनाचा दर्जा गाठू शकला"अशी माहिती
प्रा. श्री. व्ही एन बोरसे, श्रीमती शरदच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजीनियरिंग अँड पॉलीटेक्निक) यांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने