ज्येष्ठ नागरिक संघाची ३३वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न !

 ज्येष्ठ नागरिक संघाची ३३वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न !

🔴 सभेत अंदाजपत्रक तेरीज ताळेबंद -जमाखर्च मांडून पटलावरील विषयांना मंजूरी, मान्यवरांचा सत्कार

 चोपडा,दि.२(प्रतिनिधी) .विविध सुविधांनी सुसज्ज ज्येष्ठ नागरिक भवन, संघाचे स्वतंत्र बांधलेले कार्यालय , न .प .सौजन्याने खुली व्यायाम शाळा व रोज १० दैनिक वर्तमान पत्रांसहचा स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक वाचन कट्टा, विविध उपक्रमांचे - दिन विशेषांचे तसेच आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन, ज्येष्ठ नागरिक कायदे विषयक व्याख्यान असे विविध उपक्रम राबविणारा व सुमारे साडेतीनशे सदस्य संख्या असलेला असा जिल्ह्यातील १ अत्यंत चैतन्यदायी, सक्रिय ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून अनेकांनी गौरविलेल्या ज्येष्ठ नागरिक संघ चोपडाची संघाच्या कै . मगन रामदास साळुंखे ( बडगुर्जर ) सभागृह, विठ्ठल मंदिरासमोर, नारायण वाडी येथे नुकतीच दि ३० जून २०२५ सोमवार रोजी ३३ वार्षिक सर्वसाधारण सभा अजेंडया वरील विषय पत्रिके नुसार  सर्व विषय सर्व संमतीने एक मताने मंजूर करीत सुमारे १०० सदस्यांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत  खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .

सभेच्या प्रारंभी वर्षभरातील दिवंगत भारतातील सन्माननीय थोर व्यक्तिमत्त्वे, संघ सदस्य यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन  प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली . या वेळी संघ अध्यक्ष जयदेव देशमुख व कार्यकारिणी सदस्य यांच्या शुभहस्ते भारतमाता प्रतिमा पूजन - माल्यार्पण करून विषय पत्रिकेतील विषयांना प्रारंभ करण्यात आला . मागील प्रोसिडिंग वाचन सचिव विलास पाटील सर खेडीभोकरीकर, अहवाल वाचन संघ अध्यक्ष जयदेव देशमुख व वर्षभराचे अंदाजपत्रक, तेरीज, ताळेबंद ,जमा -खर्च इ कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी मांडला .

या वार्षिक सर्वसाधारण सभे स ज्येष्ठ संचालक माजी नगराध्यक्ष श्री रमणलाल गुजराथी, संघाचे माजी अध्यक्ष श्री .विजय करोडपती सर,डॉ .विकास हरताळकर, विद्यमान उपाध्यक्ष श्री . जिजाबराव नेरपगारे, ज्येष्ठ संचालक प्रा . श्यामलाल गुजराथी, गोविंदा बापू महाजन, सभागृहाचे देणगीदार विश्वनाथ रामदास साळुंखे, राजेंद्र साळुंखे, श्रीमती शकुंतला गुजराथी, मधुकर पाटील, जगन्नाथ पाटील, रमेश शिंदे, मुख्या .सुभाष पाटील, बैरागी, आर.एच.बाविस्कर, प्रा.सुधाकर पाटील, हाजी ताहेरखान,एस .एच . पाटील, भगवान देशमुख, इ . सह असंख्य सदस्यांची उपस्थिती होती .वार्षिक सर्वसाधारण सभा सूचसंचालन सचिव विलास पाटील सर खेडीभोकरीकर यांनी केले तर आभार सह सचिव अभियंता विलास सु . पाटील यांनी मानले . वार्षिक सभेच्या यशस्वीते कामी पदाधिकारी, कार्यकारी मंडळासह फेस्कॉम तालुका सचिव शांताराम पाटील,गोकूळ पाटील, संजय बजाज यांनी परिश्रम घेतले .

या सभेत विषय पत्रिकेवरील विषयां नंतर आयत्या वेळच्या विषयांत २ -३ विषयांवर साधक बाधक चर्चा होऊन खेळीमेळीत सभा पार पडली .यावेळी श्री . विश्वनाथ रामदास साळुंखे यांनी सभागृह देणगी म्हणून रुपये २५००० ची रोख रक्कम जमा केली .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने