धुळे जिल्हा आदिवासी टोकरे कोळी संघटने मार्फत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे यांचा सत्कार
धुळे दि.१७(प्रतिनिधी)धुळे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी पदी श्री राजेश इंगळे यांची नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी आपला पदाच्या कार्यभार नुकताच स्वीकारला आहे त्याबद्दल त्यांचा धुळे जिल्हा आदिवासी टोकरे कोळी संघटने मार्फत देऊन सत्कार करण्यात आला आहे.
आज दि. 17/7/2025 रोजी जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री राजेश इंगळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला त्याबद्दल धुळे जिल्हा आदिवासी टोकरे कोळी जमात बांधवांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गितांजली ताई कोळी, श्री गिरिधर अप्पा महाले, श्री विजय निकुंभे, बानुताई शिरसाठ, श्री साहेबराव कोळी, श्री देविदास नवसारे यांनी साहेबांचे स्वागत केले .