आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत..अडावदला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीरात विविध प्रमाणपत्रे व धनादेश वाटप

 आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत..अडावदला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीरात विविध प्रमाणपत्रे व धनादेश वाटप 

अडावद ता. चोपडा ,दि. ७ जून(प्रतिनिधी) येथील क्षत्रिय माळी समाज मंगल कार्यालय राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत चोपडा तालुक्यातील अडावद मंडळातील ९ गावांसाठी एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन आमदार आण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे प्रमाणपत्रे व धनादेश प्रदान केले.

या शिबिरात १४०० ते १५००  नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली.


यावेळी अमळनेर उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा आण्णासाहेब घोलप, तहसीलदार, श्री. भाऊसाहेब, गटविकास अधिकारी चोपडा पंचायत समिती अनिल विसावे, आदिवासी प्रकल्प अधिकारी यावल अरुण पवार, नायब निवासी तहसीलदार योगेश पाटील, तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंखे, प्रभारी सरपंच विजीता हरिश पाटील, माजी लोकनियुक्त सरपंच भावनाताई माळी, माजी सरपंच भारतीताई महाजन, लाडकी बहीणचे अध्यक्ष नामदेव पाटील, एम.के. शेटे सर विकासो संचालक लोकेश काबरा, वर्डीचे माजी सरपंच रवींद्र पाटील, चंद्रशेखर साळुंखे,प्रवीण सोनवणे,वकील इंगळे,गोपाल ठाकरे, रवींद्र ठाकरे,ज्ञानेश्वर इंगळे, प्रमोद बाविस्कर,नामदेव धनगर,पी. आर. माळी,सचिन महाजन हरिष पाटील, नंदु पाटील,बापु कोळी, कृष्णा महाजन,जावेद खान ,कालू भाऊ सागर ठाकरे,नवल ठाकरे, सर्व ग्रामस्थ व सर्व तालुका स्तरीय अधिकारी, कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते


📌 विभागनिहाय सेवा लाभ –

महसूल 

▪ १ लाभार्थी इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना

▪ २ लाभार्थी इंदिरा गांधी विधवा योजना 

▪ ४ लाभार्थी संजय गांधी योजना 

▪ ३ शेतकरी आत्महत्या वारसांना प्रत्येकी एक लाखांचा धनादेश वितरण 

▪ १३ विविध दाखले वाटप 

▪ ३ आधार दुरुस्ती 

पुरवठा विभाग:

▪ १४ नवीन/दुबार शिधापत्रिका वितरण

▪ ९ लाभार्थ्यांना धान्य वाटप 


निवडणूक विभाग:

▪ ६ बचत गटांना प्रत्येकी नऊ लाखाचे धनादेश वाटप 


भूमी अभिलेख विभाग:

▪ ४ वारसनोंद उतारा 

पंचायत समिती:

▪ १५ घरकुल लाभार्थी मंजुरी आदेश

▪ जलतारा योजनेअंतर्गत 07 प्रशासकीय मान्यता

▪ शिक्षण विभाग 

▪ ५ मोफत पाठ्यपुस्तक वितरण

▪ ३ महिला व बालकल्याण विभाग बेबी केअर किट 

ॲग्रीस्टॅग विभाग:

▪ २० प्रमाणपत्रे वाटप

आरोग्य विभाग:

▪ १० जन्मदाखले अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाल्यानंतर जन्मदाखले देण्यात आले.

▪ ७ स्मार्ट कार्ड आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजना 

▪ ३ स्त्री कुटुंब नियोजन लाभार्थी प्रमाणपत्र 

▪ २ पुरुष कुटुंब नियोजन बिनटाका शस्त्रक्रिया लाभार्थी प्रमाणपत्र.

▪ ३ जलतारा शोषखड्डे प्रशासकीय मान्यता आदेश 

कृषी विभाग 

▪ राष्ट्रीय अन्न व पोषण योजने अंतर्गत बचत गटाला मूग बियाणे 

▪ २ राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर वाटप 

▪ ९ पी.एम.के.एस.वाय. अंतर्गत ठिबक संच मंजुरी आदेश 

▪ ४ लाभार्थी फळबाग फळबाग लागवड मंजुरी आदेश 

▪ २ शेतकऱ्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान चेक वाटप 

मंडळ अधिकारी व तलाठी यांचा समन्वय:

▪ ६० लाभार्थी दुरुस्त ७/१३ उतारे

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन श्री. देवेंद्र पाटील (पंचायत समिती चोपडा) यांनी तर प्रास्ताविक तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी व आभार प्रदर्शन जे. पी. पाटील विस्तार अधिकारी पंचायत समिती चोपडा यांनी केले.

 विशेष नोंद- या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासनाच्या विविध सेवा मिळाल्याने प्रशासनाविषयी समाधान व सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अडावदचे मंडलाधिकारी अजय पावरा, तलाठी विजेंद्र पाटील व यांच्यासह महसूल विभाग, पंचायत समिती चोपडा, कृषी, शिक्षण, आरोग्य विभागातील यातील सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने