अडावद येथे महाजन विद्यालयात शालेय शिक्षण समितीची बैठक संपन्न

 अडावद येथे महाजन विद्यालयात शालेय शिक्षण समितीची बैठक संपन्न 

अडावद ता. चोपडा दि.१४(प्रतिनिधी) :येथील शामराव येसो महाजन विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण समितीची बैठक संपन्न झाली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

     १४ रोजी सकाळी ९ वाजता श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था अडावद संचलित शामराव येसो महाजन विद्यालयात शालेय शिक्षण समितीची बैठक संस्थेचे अध्यक्ष भगवान महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. उपाध्यक्ष वासुदेव महाजन, सचिव रमेश पवार, सहसचिव तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. डी. माळी यांची उपस्थिती होती.यात सर्वप्रथम मुख्याध्यापक आर. के. पिंपरे यांनी मागील शैक्षणिक वर्षाचा कामकाजाचा आढावा सादर केला, मुख्याध्यापक सहविचार सभेतील विषयांवर प्रकाश टाकला. त्यानंतर १६ तारखेला शाळा सुरू होत आहेत. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येऊन स्वागत करणे, विद्यार्थी शाळा प्रवेशाचा आढावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, विविध उपक्रम व शारीरिक शिक्षणात भरीव कामगीरी करणे, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे, विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण मिळाले पाहिजे. अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी सहसचिव तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. डी. माळी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

    या बैठकीत उपशिक्षक एस.जी.महाजन, एम.एन. माळी, पि.आर. माळी, एस.बी.चव्हाण, एस. के.महाजन, पि. एस. पवार, लिपिक सी.एस. महाजन व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने