उपनते पदी श्री गुलाबराव वाघ यांची निवड झाल्याबद्दल चोपडा शिवसेना उबाठा पक्षातर्फे सत्कार
चोपडा,दि.१४(प्रतिनिधी) - शिवसेना पक्षाचे उपनेते व रावेर लोकसभा संपर्कप्रमुख श्री गुलाबराव वाघ हे चोपडा येथील बैठकीसाठी आले असताना आढावा बैठक घेण्यात आली व त्यांची शिव सेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल चोपडा तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख गोपाल चौधरी ,शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक डॉक्टर महेंद्र पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख चंद्रकात शर्मा, शिवसेनेचे तालुकाप्रमुख देवेंद्र सोनवणे, युवा सेनेचे शहर प्रमुख दीपक माळी ,शिवसेनेचे शहर प्रमुख महेंद्र भोई, शशि कन्हैया ,माजी महीला आघाडी ता प्रमुख सूनदा ताई पाटील, कमलेश बडगुजर, बाळू कोळी ,प्रवीण लोहार ,मनोहर पाटील ,गोपाल पाटील ,संदीप कोळी यांच्यासह शिवसेना युवा सेना महीला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन किरण करंदीकर यांनी केला आभार प्रदर्शन दिपक माळी यांनी मानले