ग.स.संचालक मंगेश भोईटे यांना "राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित..!पालघर येथे राज्यस्तरीय टी.डी.एफ. अधिवेशनात दिला पुरस्कार

 ग.स.संचालक मंगेश भोईटे यांना "राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित..!पालघर येथे राज्यस्तरीय टी.डी.एफ. अधिवेशनात दिला पुरस्कार

चोपडादि.५(प्रतिनिधी) :-- ग स संचालक व (कै.) हि मो. करोडपती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश रमेश भोईटे यांना सपत्नीक नुकताच जळगांव जिल्ह्यातुन  महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) च्या वतीने पालघर येथे राज्यस्तरीय अधिवेशनात माजी आदिवासी विकास मंत्री आ राजेंद्र गावित,राज्य टीडीएफ चे अध्यक्ष जी के थोरात  यांच्या हस्ते राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष आर एच बाविस्कर,निशांत रंधे, आर आर पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातुन एच जी इंगळे यांना जीवन गौरव तसेच राजेंद्र शिंदे ही यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल साने गुरुजी विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ दीपक पाटील डॉ.दिलीप पाटील ,उमेश करोडपती, पंकज बडगुजर, व्ही.एच. करोडपती, विठ्ठल पाटील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर  कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.


फोटो :--पालघर येथे राज्यस्तरीय अधिवेशनात माजी आदिवासी विकास मंत्री आ राजेंद्र गावित यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतांना मंगेश भोईटे,आदी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने